Petrol Diesel Price : जाणून घ्या तुमच्या शहरातील ‘पेट्रोल-डिझेल’चे दर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शनिवारी सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली नाही. तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) गेल्या एका आठवड्यापासून डिझेलच्या किंमतींवर ब्रेक लावला आहे. मात्र, शनिवारी काही शहरांमध्ये डिझेलच्या दरात किंचित बदल करण्यात आला. आज, राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 80.43 रुपये आणि डिझेलची किंमत 73.56 रुपये प्रति लिटर आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात.

जाणून घ्या देशातील बड्या शहरांमधील आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती

दिल्ली- पेट्रोल 80.43 रुपये आणि डिझेल 73.56 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबई- पेट्रोल 87.19 रुपये आणि डिझेल 80.11 रुपये प्रति लिटर आहे.
कोलकाता- पेट्रोल 82.05 रुपये आणि डिझेल 77.06 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नई- पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझेल 78.86 रुपये प्रति लिटर आहे.
नोएडा- पेट्रोल 81.14 रुपये तर डिझेल 73.87 रुपये प्रति लिटर आहे.
गुरुग्राम- पेट्रोल 78.69 रुपये तर डिझेल 74.03 रुपये प्रति लिटर आहे.
लखनऊ- पेट्रोल 81.04 रुपये आणि डिझेल 73.77 रुपये प्रति लिटर आहे.
पटना- पेट्रोल 83.31 रुपये आणि डिझेल 78.72 रुपये प्रति लिटर आहे.
जयपूर- पेट्रोल 87.60 रुपये आणि डिझेल 82.62 रुपये प्रति लिटर आहे.

यामुळे पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी जास्त होते

आंतरराष्ट्रीय इंधन बाजारामध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतीतील बदल थेट स्थानिक बाजारात दिसून येतो. याचा अर्थ असा की एखाद्या दिवशी कच्चे तेल 0.11 डॉलर ने महाग होते तर कधीकधी 0.14 डॉलर प्रति बॅरलने स्वस्त होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, या आधारावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

घरबसल्या जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोलची किंमत

एसएमएसद्वारे कोणतीही व्यक्ती दररोज आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत देखील तपासू शकते. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या नंबरवर पाठवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9223112222 या नंबरवर पाठवू शकतात. एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड> लिहून 9222201122 या नंबरवर पाठवू शकतात.