Petrol Diesel Price Today : 12 दिवसानंतर ‘डिझेल’चे दर वाढले, जाणून घ्या एक लिटर ‘पेट्रोल’ची किंमत

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रविवारी पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. देशात 12 दिवसानंतर पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या प्रति लिटरच्या दरात 16 पैशांची वाढ केली आहे. मात्र, पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. या वाढीसह राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 80.43 रुपये प्रति लिटर वर आहे, परंतु एक लिटर डिझेलसाठी तुम्हाला आता 80.94 रुपये द्यावे लागतील. शनिवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 80.43 रुपये तर डिझेलची किंमत 80.78 रुपये होती.

दररोज सकाळी 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्यांची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

देशातील मोठ्या शहरांमधील आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाणून घ्या

दिल्ली- पेट्रोल 80.43 रुपये आणि डिझेल 80.94 रुपये लिटर आहे.
मुंबई- पेट्रोल 87.19 रुपये आणि डिझेल 79.17 रुपये लिटर आहे.
कोलकाता- पेट्रोल 82.10 रुपये आणि डिझेल 76.05 रुपये लिटर आहे.
चेन्नई- पेट्रोल 83.63 रुपये आणि डिझेल 78.01 रुपये लिटर आहे.
नोएडा- पेट्रोल 81.08 रुपये आणि डिझेल 72.91 रुपये लिटर आहे.
गुरुग्राम – पेट्रोल 78.64 रुपये आणि डिझेल 73.09 रुपये लिटर आहे.
लखनऊ- पेट्रोल 80.98 रुपये आणि डिझेल 72.81 रुपये लिटर आहे.
पटना- पेट्रोल 83.31 रुपये आणि डिझेल 77.77 रुपये लिटर आहे.

अशाप्रकारे तपासावी आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत

तुम्ही पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर एसएमएसद्वारे देखील माहित करून घेऊ शकता. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP असे लिहून 9224992249 या नंबर वर आणि बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 नंबर वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहक HPPrice असे लिहून 9222201122 या नंबर वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like