Petrol Diesel Price : आज पुन्हा स्वस्त झाले डिझेल, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी आज डिझेलच्या दरात पुन्हा बदल केला आहे. आज डिझेलचे दर 8 पैसे प्रति लीटरपर्यंत कमी झाले आहेत. तर पेट्रोलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, पेट्रोलच्या किमतीत मागील सात दिवसात कोणताही बदल झालेला नाही. मंगळवारी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 87.74 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर डिझेलचा दर 77.04 रुपये प्रति लीटरवर आला आहे. दोन दिवसात डिझेलच्या भावात 28 ते 30 पैसे प्रति लीटर घसरण झाली आहे. मागणीमुळे अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण दिसून येत आहे, ज्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारात इंधनावर झाला आहे.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

मुंबई 87.74 – 77.04
पुणे 88.45 – 76.66
ठाणे 87.44 – 75.66
अहमदनगर 87.58 – 75.75
औरंगाबाद 87.96 – 76.11
धुळे 88.37 – 76.52
कोल्हापूर 88.15 – 76.39
नाशिक 87.58 – 75.82
रायगड 87.63 – 75.84

प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे. या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता