आज शिवसेनेचे मुंबईत तर पंकजा मुंडेंचे बीडमध्ये शक्तीप्रदर्शन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर  आज शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केंद्र व राज्य सरकारवर तोफा डागण्याची शक्यता आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आगामी निवडणुकांसाठी कोणती भूमिका जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर दुसरीकडे बीडमधील पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे पंकजा मुंडे दसरा मेळावा घेणार आहेत. यामध्ये त्या काय बोलणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. शिवसेना आणि पंकजा मुंडे यांचे शक्तीप्रदर्शन दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दिसून येणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’da79b8df-d28a-11e8-aec6-6dd6e90f0aae’]

आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणार का, हा सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवसेना स्वबळावर लढणार असा नारा मागील काही महिन्यात उद्धव ठाकरे यांनी अनेकदा दिला आहे. तसेच गेल्या चार वर्षांत काँग्रेस वा राष्ट्रवादी या विरोधकांनी घेतली नसेल तेवढी भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांवर सातत्याने शिवसेनेने टीका केली आहे. आता दसरा मेळाव्यात भाजपसह अन्य विरोधी पक्षांबाबत उद्धव ठाकरे काय मतप्रदर्शन करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा यंदाचा हा दसरा मेळावा आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या रोजच्या वाढत्या किंमतीने सर्वसामान्य माणूस हैरान आहे. ऑक्टोबरमध्येच राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शेतकरी कर्जमाफीची सरकारने केलेली घोषणा नुसता फार्स ठरली असल्याची स्थिती आहे. दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी त्रस्त आहे. महागाईने उच्चांक गाठला असून शहरी चाकरमानी त्यात भरडला जात आहे. याविरोधात उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात भाजपावर टिकास्त्र सोडण्याची शक्यता आहे.

[amazon_link asins=’B01LL1TL4W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e6f1b541-d28a-11e8-af8c-71f52b8c7f50′]

तर दुसरीकडे दरवर्षी प्रमाणे पंकजा मुंडेही बीडमध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करणार आहेत. पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील संघर्षानंतर गेल्या वर्षी सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे स्थलांतरीत केलेल्या दसरा मेळाव्याला यावेळी कसा प्रतिसाद मिळतो याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. हा मेळावा राजकीय विरोधाबरोबरच पक्षांतर्गत नेतृत्व स्पर्धेत प्रभाव टाकणारे शक्तीपीठ व्हावे यासाठी गर्दीचा उच्चांक मोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऊसतोड मजुरांच्या संपावर या मेळाव्यातून तोडगा काढून राज्यभरातील ऊसतोडणी मजूर व वंजारी समाजाचे नेतृत्व सिध्द करण्याची संधी साधली जाईल असे मानले जात आहे.

शिर्डीतील मोदींच्या कार्यक्रमाचा तीन कोटींचा खर्च साई संस्थान करणार