अमेरिकेतील चित्रपटगृहांत  हा मराठी चित्रपट आज होणार प्रदर्शित 

मुंबई : वृत्तसंस्था
मराठी  चित्रपट अमेरिकेत  प्रदर्शित होणं  ही काही नवी गोष्ट नाही परंतु प्रदर्शित झाल्यावर लगेच अमेरिकेतील चित्रपटगृहात झळकण्याचा मान ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाने मिळवला आहे.

[amazon_link asins=’B00L28DGKA,B01AHXIDWG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’60d246f6-b263-11e8-82d4-132a258e22b2′]

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या  चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केल्याचं पाहायला मिळालं आहे. या चित्रपटाचे  राज्यभरातील २३२ चित्रपटगृहांतून दररोज ४१० शोज दाखविले जात असून ब-याच काळानंतर एक उत्तम थरारपट पाहिल्याचा अनुभव प्रेक्षकांमधून व्यक्त केला जात आहे. रंगभूमी गाजवलेलं हे नाटक, चित्रपटरूपातही प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झाले आहे . प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या या चित्रपटाला अमेरिकेतील चित्रपटगृहात झळकण्याचा मान  मिळाला आहे .
३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आज  अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. ऑस्टीन, शिकागो, लॉस एंजिलस, वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को, अटलांटा, सिएटेल, डॅलस, पोर्टलॅण्ड, सॅक्रामेंटो, एडिसन या शहरांतील चित्रपटगृहात हा प्रदर्शित होणार आहे.

राज्यात जून महिन्यात तब्बल १२६१ बालकांचा मृत्यू

अभिनेता जॉन अब्राहम यांची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे- जोशी यांनी केलं आहे. या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका  आहेत.