सबरीमाला मंदिर: महिलांच्या प्रवेशाबाबत आज सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

केरळमधील सबरीमाला मंदिर या ऐतिहासिक मंदिरात १० ते ५० वयोगटातील मुली आणि महिलांना प्रवेशबंदी आहे. या प्रथेसंबंधी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार असून, पुरूषांबरोबर महिलांनादेखील बरोबरीने पूजेचा समान अधिकार मिळणार की नाही, याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन आणि काही संस्थांनी या प्रथेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. या प्रथेमुळे स्त्री-पुरूष, असा भेदभाव केला जातो. त्यामुळे ही प्रथा बंद करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2de2621f-c2da-11e8-a00c-85697541ae6a’]

पूजा करण्यासाठी पुरुषांना वेगळा नियम आणि स्त्रियांना वेगळा नियम का, असा प्रश्न न्यायालयाने सुनावणीदरम्यान विचारला होता. यावेळी बचाव करताना मंदिराच्या विश्वस्त मंडळाने न्यायालयात बाजू मांडताना म्हटले, की सबरीमाला मंदिरातील देव अय्यप्पा मंदिरात वार्षिक उत्सवाच्या सुरुवातीच्या पाच दिवसांसाठी महिलांना सूट देण्यात येते. यावेळी महिला मंदिरात प्रवेश करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान मंदिर विश्वस्त मंडळाला खडेबोल सुनावले होते.

कुठल्या आधारावर महिलांना प्रवेशापासून रोखले जाते? पूजा करणे हा महिलांचा संवैधानिक अधिकार आहे. मंदिरात पूजा करण्यासाठी कोणत्याही विश्वस्त मंडळाच्या कायद्याची गरज नाही. मंदिर विश्वस्ताचे कृत्य हे संविधानाच्या विरोधात आहे. मंदिर ही कुणाची खासगी मालकी नाही, ती जागा सार्वजनिक आहे. सबरीमाला मंदिरात जाण्यापासून कुणी कुणाला रोखू शकत नाही. पूजा करण्यासाठी संविधानाने स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार दिला आहे, अशा शब्दात न्यायालयाने मंदिर विश्वस्त मंडळाला सुनावले होते.

रेती माफियांचा तहसीलदारांवर हल्ला

केरळमधल्या पश्चिमी घाटात असलेल्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश बंदी असून १० ते ५० वयोगटातील मुली आणि महिलांना मासिक माळी येत असल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात येतो. सबरीमाला मंदिर काही महिनेच भाविकांसाठी खुले असते. सबरीमाला मंदिर केरळची राजधानी तिरुवनंतपूरमपासून १७५ किमी अंतरावर असून, उंच डोंगरावर आहे. या मंदिराच्या चारही बाजूने डोंगर आहे. मंदिरावर पोहचण्यासाठी अनेक पायऱ्या चढव्या लागतात. पायऱ्यांतील सुरुवातीच्या पाच पायऱ्या मानवाच्या इंद्रियाशी संबंधित आहेत. तर नंतरच्या आठ पायऱ्या भावनेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यानंतरच्या तीन पायऱ्या माणसांच्या गुणांशी तर शेवटच्या दोन पायऱ्या ज्ञान आणि अज्ञानाचे प्रतीक मानले जातात. पुराणिक कथेनुसार अय्यप्पा हे महादेव आणि मोहिनी (विष्णूचा एक अवतार) यांचा मुलगा मानला जातो. अय्यप्पाला हरीहरपुत्र म्हणूनही ओळखले जाते. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव. या दोघांच्या नावावरून हरीहरपुत्र हे नाव पडले आहे. या नावा शिवाय, अय्यप्पन, शास्ता, मणिकांता या नावानेही ओळखले जाते.

[amazon_link asins=’B0095OPLGA,B00FT694AC,8193305205′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5d8d4b22-c2da-11e8-8aea-75356402573e’]