सुजय विखे भाजप प्रवेशानंतर आज जाणार ‘मातोश्री’वर  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काल दि. १२ ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज सुजय विखे-पाटील हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. आज दुपारी १२: ३० वाजता सुजय मातोश्रीवर जाणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

भाजप प्रवेशानंतर युतीतील पक्ष शिवसेनेशीही नातं जुळलंच आहे. लोकसभेच्या रिंगणात उतरताना राजकारणातील दिग्गजांचे आशीर्वाद घेणे गरजेचे आहेत. त्यामुळे सुजय विखे पाटील हे मातोश्रीवर जाणार आहेत. तेथे जाऊन ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला अभिवादन करणार आहेत. तसंच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

हेही वाचा – युतीचा प्रचार ठरला ; ‘या’ शहरात फोडणार प्रचाराचा नारळ 

भाजपकडून अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून सुजय विखे हे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता या मतदार संघात त्यांना शिवसेनेची साथ मिळावी यासाठी ते उद्धव यांच्याकडे विनंती करतील.

दरम्यान, मोठ्या चर्चेनंतर सुजय विखे यांचा भाजप प्रवेश झाला आहे. ते लोकसभेसाठी नगरच्या जागेवरून इच्छुक होते. पंरतू राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्यण घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांच्या उपस्थित हा प्रवेश केला.