अखेर विजयसिंह मोहिते-पाटील होणार आज ‘भाजपवासी’

अकलुज : पोलीसनामा ऑनलाइन – अकलुज येथे आता काही वेळातच होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत खासदार विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

पुण्यातील राजभवन येथे काल रात्री मुक्काम करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात लोहगाव विमानतळावरुन अकलुजकडे रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने रणजितसिंह मोहिते पाटील यांना तिकीट देण्यास विलंब केल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा पासून विजयसिंह मोहिते पाटील काय करणार याविषयी चर्चा सुरु होती.

आज अकलुजमध्ये होत असलेल्या सभेत मोहिते पाटील यांनी आपली ताकद दाखविण्यासाठी मोठे शक्तीप्रदर्शन केले असून लाखाहून अधिक लोकांनी सभेच्या ठिकाणी गर्दी केली आहे.

अकलूज येथील सभेत खा. विजयसिंह मोहिते – पाटील, सुधाकरपंत परिचारक, आ. निलम गोरे, कांचन कुल, आ. प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते- पाटील, चंद्रकांतदादा पाटील, शहाजी पवार, उत्तमराव जानकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित राहिले आहेत. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभेच्या ठिकाणी आगमन झाले असून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या स्टेजवरील उपस्थितीमुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे.