आज वाशिम बंद : जवानाच्या हत्येची चौकशी करण्याची मागणी

वाशिम : वृत्तसंस्था

भारतीय लष्करातील सुनील धोपे यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत असून त्यांच्या मृत्यूची चौकशी करावी या मागणीसाठी आज मंगळवारी वाशिम बंदची हाक देण्यात आली आहे. सरकारने धोपे कुटुंबियांच्या अटी मान्य न केल्याने खासदार भावना गवळी यांनी वाशिम बंद करण्याचे आवाहन केले आहे. मृत सुनील धोपे यांच्या नातेवाईकांनी हत्या प्रकरणी चौकशीची हमी दिल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला होता.

[amazon_link asins=’B06XWCVFTF,B01N7RX8Z6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f51cdd5e-bafa-11e8-814e-cfcabb11b9b0′]

वाशिम येथील भारतीय लष्करातील जवान सुनील धोपे यांचा मेघालयमधील शिलाँग येथे मृत्यू झाला होता. शिलाँग येथील सीमा सुरक्षा दलाच्या विभागीय कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. जवान सुनील धोपे यांनी आत्महत्या केल्याचे लष्कराने जाहीर केले होते. मात्र ही आत्महत्या नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा संशय त्यांच्या कुटुंबियांचे व्यक्त केला आहे. या संदर्भातील एक पत्र देखिल धोपे कुटुंबियांनी भारतीय सैन्य दलाला पाठवले होते. त्यामध्ये त्यांनी आपली हत्या होणार असल्याचे सुनील धोपे यांनी फोनवरुन वडीलांना सांगितल्याचे नमूद केले होते.

त्यांनी एटीएसला पळविले ४० हजार किमी

या संशयित हत्येची चौकशी व्हावी अशी कुटुंबीयांची मागणी आहे. त्यांच्यासोबत घातापघात झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे. या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची हमी दिली जात नाही, तोपर्यंत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी कुटुंबियांची भूमिका आहे. यासाठीच आज वाशिम बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. मृत जवान सुनील धोपे यांच्या मागे पत्नी, आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे.