Petrol Diesel Price Today | इंधन दरवाढ सुरूच; पेट्रोल 34 पैसे तर डिझेल 28 पैशांनी महागले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Petrol Diesel Price Today |कोरोनाचे संकट आद्यपही कमी झालेले नसताना इंधन दरवाढ (Fuel price hike) व महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पाच राज्यातील निवडणुका झाल्यापासून इंधन दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. पेट्रोल तर शंभरीच्या पलीकडे गेले आहे. त्यातच शनिवारी पुन्हा एकदा इंधन दरवाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल ३४ पैशांनी महागलं आहे. तर डिझेलच्या दरात वाढ २८ पैशांची वाढ झाली. त्यामुळे आज अनुक्रमे पेट्रोलसाठी १०६.९३ रुपये तर डिझेलसाठी ९७.४६ रुपये मुंबईकरांना मोजावे लागणार आहे. todays fuel price petrol diesel price today 10th jully 2021

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

इंधन दरवाढीचे चटके दिल्लीकरांनाही सहन करावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर ३५ पैशांनी वधारले आहेत. तर डिझेल २६ पैशांनी महागले आहे.
त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे १००.९१ रुपये आणि ८९.८८ रुपये मोजावे लागतील. भोपाळमध्ये पेट्रोल १०९.२४ रुपये तर डिझेल ९८.६७ रुपये आहे.
तर कोलकातामध्ये लोकांना पेट्रोलसाठी १०१.०१ रुपये आणि डिझेलसाठी ९२.९७ रुपये मोजावे लागतील. दरम्यान पेट्रोलच्या दराने शंभरी पार केलेल्या राज्यांमध्ये दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान,
मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-कश्मीर, ओडिशा, तामिळनाडू,
केरळ, बिहार, पंजाब, लद्दाख आणि सिक्किमचा समावेश होतो.

 

दिल्लीमध्ये सीएनजीही महागला

एकीकडे इंधन दरवाढ सुरूच असताना दिल्लीसह परिसरात सीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ कंपनीने हि दरवाढ केली असून किलोमागे सीएनजीच्या दरामध्ये ९० पैशांनी वाढ केली आहे.
याशिवाय पाईपद्वारे पुरविण्यात येणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरामध्येही एक घनमीटरला १.२५ रुपयांची वाढ केली आहे.

भाजप प्रवक्त्याचं अजब विधान; म्हणाले मोदीजी कांदे, टोमॅटो आणि पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी आलेले नाहीत तर… इंधन दरवाढीवरून विरोधकांनी केंद्रसरकारला घेरले आहे.
दररोज केंद्र सरकारवर निशाणा साधला जात असतानाच आता इंधन दरवाढीवरून भाजपच्या एका प्रवक्त्यांनी अजब विधान केलं आहे.
प्रवक्त्या सारिका जैन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलची किंमती कमी करण्यासाठी नव्हे तर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आले असल्याचे म्हटले. एवढंच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इतिहास नेहमीच लक्षात ठेवेल कारण मोदींनी तिहेरी तलाक,
कलम ३७० रद्द करून अयोध्येत राम मंदिर तयार करण्यास सुरुवात केले आहे.
या कामामुळेच इतिहास त्यांना लक्षात ठेवेल असे जैन यांनी म्हंटले आहे.

Web Title : todays fuel price petrol diesel price today 10th jully 2021

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

mumbai corona vaccination | मुंबईत कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधातून मिळणार सवलत ?

Pune Metro। पुणेकरांना लवकरच मेट्रोतून प्रवास करता येणार; सप्टेंबरपर्यंत मेट्रोची कामे गतीने वाढवण्याचा प्रयत्न, महामेट्रोची माहिती

Mumbai Crime News | धक्कादायक ! तृतीयपंथीयाने चिमुरडीला जिवंत पुरले; कुटुंबीयांनी पैसे न दिल्याच्या रागात अपहरण करून केली हत्या