चांदीच्या किंमतीत चालू महिन्यातील सर्वात मोठी घसरण, जाणून घ्याच आजचा सोन्याचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये आलेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर आज पुन्हा वाढले आहेत. शुक्रवारी दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 153 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीची किंमत 665 रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमती घसरतील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण, कोरोनामुळे लॉकडाऊन असलेला देश आता अनलॉक होत आहेत. त्यामुळे पुन्हा अर्थव्यवस्था सुरु होणार आहे. म्हणूनच शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. अशातच गुंतवणूकदार आता सोन्यात नफा मिळवू शकतात.

सोन्याचा नवा दर
शुक्रवारी दिल्लीमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47 हजार 991 रुपयांवरून 48 हजार 144 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचली आहे. तर गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47 हजार 713 रुपयांवरून 48 हजार 190 वर पोहोचली. याआधी बुधवारी दिल्लीमध्ये 10 ग्राम सोन्याची किंमत 47 हजार 419 रुपयांवरून 47 हजार 664 रुपये इतकी झाली आहे. यावेळी किंमतीमध्ये प्रति दहा ग्रॅम 245 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

चांदीचे नवे दर
शुक्रवारी दिल्लीत 1 किलो चांदीची किंमत 49 हजार 900 रुपयांवरून 49 हजार 235 रुपयांवर आली आहे. यावेळी किंमत 665 रुपयांनी घसरली आहे. गुरुवारी 1 किलो चांदीचा दर 49 हजार 868 रुपयांवर आला होता. तर याआधी बुधवारी चांदीच्या दरात घसरण झाली होती. दिल्लीत एक किलो चांदीची किंमत 49 हजार 450 रुपयांवरून 49340 रुपयावर आली होती. यावेळी किंमतीमध्ये 110 रुपयाची घसरण झाली होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीचे दर प्रति औंस 17.63 डॉलवर पोहोचला आहे.

1 रुपयात सोने खरेदी करा
सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे ते खरेदी करणं प्रत्येकाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. परंतु तुम्हाला सोनं घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही डिजिटल सोन्याच्या स्वरुपात कमी प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करु शकता. डिजिटल सोन्याच्या खरेदीमध्ये 24 कॅरेट म्हणजे 99.99 टक्के शुद्ध सोनं डिजिटल पद्धतीनं सुरक्षित ठेवता येऊ शकतं आणि तुम्हाला हवं असेल तेव्हा त्याची विक्री करता येते. डिजिटल रुपात 1 रुपयालाही सोनं खरेदी करता येत. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही पेटीएम, गुगल पे सुद्धा तुम्हाला या सुविधा देत आहेत.