Today Gold Rates : सोने खरेदीकडे ग्राहकांची पाठ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचं (coronavirus) सावट फक्त देशावरच नाही तर संपूर्ण जगावर आहे. कोरोनाचा फटका प्रत्येक देशांच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. सर्वच देशांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्याचप्रमाणे मागील काही दिवसांपासून सोन्याचे (gold rates) दर देखील अस्थिर झाले आहेत. त्यामुळे ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली. गेल्या वर्षाच्या तुलनेत सोने 25 टक्क्यांनी महागले. सोन्याच्या सतत होत असलेल्या चढ-उतारामुळे ग्राहकांनी फक्त सोन्याच्या दराची चौकशी करणे पसंत केले.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्यावर्षी सोन्याच्या विक्रीत 50 ते 60 टक्क घसरण झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 2019 मध्ये सोन्याचे दर दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रती 10 ग्रॅम 38 हजारांच्या आसपास होते. तर या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56 हजार 200 रुपयांवर पोहोचला आहे. रविवारी सोन्याचे भाव 51 हजार रुपयांच्या घरात पोहोचला.

दरम्यान, युरोपमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा पसरल्यामुळे कमॉडिटी बाजारात सोने-चांदीचे दर घसरले आहेत. जगात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता सोने, क्रूड आणि बे मेटलचे दर आणखी घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

goodreturns या वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 50 हजार 50 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 51 हजार 50 रुपये आहेत. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 49 हजार 400 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचे दर 52 हजार 890 रुपये आहे. त्याच प्रमाणे कोलकता आणि चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 50 हजार 510 रुपये आणि 47 हजार 220 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 710 रुपये आणि 51 हजार 510 रुपये आहे.