Gold-Silver Rate Today : ‘सोन्या-चांदी’दरात पुन्हा घसरण ! जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्या चांदीच्या दरानं (Gold-Silver Rate) गेल्या काही दिवसांपासून उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु गुरुवारी सोन्याचांदीचा भाव घसरल्याचं दिसून आलं. सोन्या-चांदीचे दर कमॉडिटी बाजारात कमी झाल्याचं दिसत आहे. युरोपमध्ये कोरोना संसर्ग पुन्हा पसरला आहे. यामुळंच सोनं-चांदी स्वस्त झालं आहे. जगातील कोरोना रुग्णांची वाढ पाहता सोनं, क्रूड आणि बेस मेटल यांचे दर आणखी घसरण्याची शक्यता असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.

एका वेबसाईटनुसार, सोन्या-चांदीच्या भावात शुक्रवारी देखील घसरण पहायला मिळाली. मुंबईत (Mumbai) 22 कॅरेट (22 Carat) सोन्याचे दर 50100 रुपये आहे तर 24 कॅरेट (24 Carat) सोन्याचे दर 51100 रुपये आहेत. दिल्लीबद्दल (Delhi) बोालयचं झालं तर 22 कॅरेट सोन्याचे दर 49610 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे दर हे 54120 रुपये आहेत.

कोलकाता (Kolkata) आणि चेन्नईमध्ये (Chennai) 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 50110 आणि 47200 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर हे 51710 आणि 51490 रुपये आहेत.

सध्या सर्वत्र उत्सवाचा हंगाम आहे. असं असतानाही सोन्याला जास्त मागणी नाही असंच काहीसं चित्र पहायला मिळत आहे.

You might also like