Gold Price Today : महिन्यात प्रथमच स्वस्त झाली चांदी, जाणून घ्या 10 ग्राम सोन्याचा भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्या-चांदीच्या भावात होणारी वाढ आता कमी होऊ लागली आहे. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात किरकोळ वाढ नोंदवली गेली. त्याचबरोबर एक किलो चांदीच्या भावातही किरकोळ घट झाली आहे. देशांतर्गत शेअर बाजारात परतलेली खरेदी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती घसरल्यामुळे ही तेजी थांबली असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र येत्या काही दिवसांत ही वाढ पुन्हा होऊ शकते.

सोन्याचे नवीन भाव
मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५४,८७३३ वरून ५४,८३० रुपये प्रति १० ग्राम झाला आहे. या दरम्यान प्रति १० ग्रॅमच्या भावात ९७ रुपये किरकोळ वाढ झाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील ९९.९ टक्के सोन्याचा भाव वाढून ५३,९९६ रुपये प्रति १० ग्राम झाला आहे.

चांदीचे नवीन भाव
मंगळवारी सोन्यापेक्षा चांदीच्या भावात घट नोंदवली गेली आहे. दिल्लीत एक किलो चांदीचा भाव ६६,८६० रुपयांवरून ६६,८५५ रुपयांवर आला आहे. या दरम्यान किंमतीत ५ रुपयांची किरकोळ घट झाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील चांदीचा दर प्रति किलो ६४,९२५ रुपयांवर आला आहे.

सोन्याच्या किंमतीबाबत काय आहे तज्ञांचे मत ?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांचे म्हणणे आहे की, रुपयातील किरकोळ घसरणीने सोन्याच्या भावाला आधार मिळाला आहे. मात्र इतर तज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे कि कोविड-१९ साठी १००% प्रभावी लस तयार होण्याची शक्यता फारच कमी आहे. सोन्याच्या दराला यामुळेही पाठिंबा मिळाला. या व्यतिरिक्त जेव्हा व्याज दर कमी असते, तेव्हा सोन्याला फायदा होतो. सोन्याला महागाई विरुद्ध हेजिंगचा पर्याय मानला जाते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like