सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ ! पहिल्यांदाच 56 हजाराच्या पुढं तर चांदी 73 हजाराच्या टप्प्यात, जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे आणि आर्थिक वाढीच्या तीव्र चिंतेमुळे सोन्यात सुरक्षित गुंतवणुकीची गती वाढली आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती नवीन शिखरावर पोहोचल्या. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत १३६५ रुपयांची वाढ झाली. यावेळी दिल्लीत एक किलोग्राम चांदीची किंमत प्रथमच ७२,७२६ च्या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, कमकुवत डॉलर, केंद्रीय बँकांकडून प्रोत्साहित उपाय आणि कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे सोन्याच्या सुरक्षित गुंतवणूकीत वाढ झाली आहे. नैसर्गिक आपत्ती, महामारी आणि राजकीय तणावात सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. मंगळवारी पाच वर्षांच्या यूएस ट्रेझरी बॉण्डमध्ये घट नोंदली गेली. तर दहा वर्षांच्या ट्रेझरीचे उत्पन्न पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेले.

सोन्याचे नवीन दर
बुधवारी दिल्ली सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्च पातळी ५६,१८१ रुपये प्रति १० ग्रामवर पोहोचला आहे. याअगोदर मंगळवारी हा भाव ५४,८१६ रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाला होता. यादरम्यान सोन्यामध्ये १३६५ रुपये प्रति ग्रामने सर्वात मोठी वाढ झाली आहे. तर मुंबईमध्ये सोन्याचे भाव वाढून ५५,२०१ रुपये प्रति १० ग्राम झाले आहेत.

चांदीच्या भावात विक्रमी वाढ
बुधवारी दिल्लीत एक किलोग्रॅम चांदीचा भाव ६६,७५४ रुपयांवरून ७२,७२६ रुपये झाला आहे. यादरम्यान किंमतीत ५९७२ रुपयांची मोठी वाढ झाली आहे. मुंबईत चांदीचे भाव वाढून ६९,२२५ रुपये प्रति किलोग्रामवर गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने नवीन उच्चांकी गाठली
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा हाजीर भाव आज २०२० डॉलर प्रति औसवर गेला. अमेरिकन सोन्याचा वायदा भाव ०.९ टक्क्याने वाढून २.०३९ डॉलरवर बंद झाला. यावर्षी जागतिक बाजारात सोन्याच्या भावात ३३ टक्के वाढ झाली आहे.

सोन्याच्या भावात वाढ का झाली ?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल म्हणतात की, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा भाव नव्या शिखरावर २,०३२ डॉलर प्रति औसवर पोहोचला. तर चांदीचे भाव २६.४० डॉलर प्रति औसवर पोहोचले. यामुळेच देशांतर्गत सोन्याचा भाव वाढला.