Gold Price : 3 दिवसानंतर स्वस्त झालं सोनं, आतापर्यंत किमतीत झाली 5374 रुपये प्रति दहा ग्रॅमची घसरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मंगळवारी अंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या तेजीमुळे सोन्याचे दर घसरून 3 आठवड्याच्या खालच्या स्तरावर आले आहेत. याचा परिणाम स्थानिक बाजारांवर सुद्धा दिसत आहे. मंगळवारी कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली. एमसीएक्सवर, आज सुरूवातीच्या व्यवहारात डिसेंबर डिलिव्हरीवाले सोने 0.55% घसरून 50,826 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले होते. अशाच प्रकारे चांदी वायदा 1.2% घसरून 62,343 प्रति किलोग्रॅमवर आली आहे. सोने आणि चांदी दोन्ही धातूंमध्ये मागील सत्रात घसरण नोंदली गेली होती. वरच्या स्तरावरून आतापर्यंत सोने 5374 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत स्वस्त झाले आहे.

अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोन्याच्या किंमती आज नरम होत्या. परदेशी बाजारात हाजिर सोने 0.1 टक्केच्या घसरणीसह 1919.51 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते. तर, चांदीचा भाव 0.4 टक्के घसरून 25.02 डॉलर प्रति औंसवर होता. सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली नाही, कारण देश आणि परदेशात कोरोना व्हायरसची प्रकरणे वेगाने वाढत आहेत आणि वॅक्सीनबाबत सुद्धा कोणतीही डेडलाइन स्पष्ट झालेली नाही.

सोन्याच्या नव्या किंमती
एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोने 240 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत महागले होते. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव वाढून 52,073 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर पोहचला. तर, यापूर्वी शुक्रवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सोन्याचा भाव 51,833 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

चांदीचे नवे दर
सोमवारी चांदीच्या किमतीत सुद्धा तेजी आली होती. चांदी 786 रुपये प्रति किलोग्रॅम महाग होऊन 64,927 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. शुक्रवारी चांदीचा भाव 64,141 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. अशाप्रकारे आज चांदीच्या किमतीत प्रति किलोग्रॅम 786 रुपयांची तेजी आली आहे.

पुढे काय होणार?
एक्सपर्टचे म्हणणे आहे की, अमेरिकन मदत पॅकेजची अनिश्चितता जारी आहे. यासाठी आता व्यवसायिकांची नजर ब्रिटेनच्या व्यापार करारावर आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनने यांनी यूरोपीय संघ व्यापार कराराची रूपरेषा तयार करण्यासाठी गुरुवारचा कालावधी ठरवला आहे.

दिवाळीपर्यंत सोने एका रेंजमध्ये राहू शकते. जर वरच्या स्तराबाबत बोलायचे तर ते 51,500 पासून 52800 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत पोहचू शकते. तर, खालच्या स्तराचे भाव घसरून 49,800 प्रति दहा ग्रॅमवर येण्याची शक्यता आहे.