Gold Rates : सलग चौथ्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ कायम

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  गुरुवारी जागतिक बाजारपेठेत जोरदार शेअर बाजार सुरू झाला. मुंबईत २२ कॅरेट सोन्यामध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,११० वर पोहोचला तर काल हा भाव ४८,१०० वर होता. चांदीबद्दल बोलायचं झाल्यास आज १० ग्रॅम सोन्याची किंमत ६७१ वर पोहोचली असून कालचा भाव ६६५ रुपये इतका होता. जागतिक बाजारात सेन्सेक्सनं उसळी मारल्यानंतर आता सोन्याचे भावही वधारल्याचं दिसून आलं. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती वाढल्याचं पाहायला मिळालं. आज अमेरिकेत होणाऱ्या हालचालींमुळे सोन्या-चांदीच्या भावांमध्येही वाढ झाल्याचं समोर आलं आहे. (todays gold rate silver rate hike because of america joe biden know here today’s rate of gold and silver)

दरम्यान, जो बायडन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्रपती बनल्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत जोरदार तेजी पाहायला मिळाली. याचा परिणाम जागतिक बाजारपेठेबरोबरच देशांतर्गत बाजारावरही झाला. यावेळी सेन्सेक्स (Sensex) पहिल्यांदाच ५०,००० वर पोहोचला आहे. तर निफ्टी १४,७०० च्या पुढे गेली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी ट्रेझरी सेक्रेटरी म्हणून जेनेट येलेन यांचं नाव निर्देशित केल्यानं परदेशी बाजारपेठ तसेच भारतीय बाजारपेठेतील सोन्याची चमक वाढली. अशात आज बायडन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यामुळे मार्केट आणखी वाढलं आहे. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारी वायदा व्यापार ०.४३ टक्क्यांवर होताना दिसला. MCX वर १० ग्रॅम सोन्याची किंमत ४९,१९५ रुपयांवर होती. तर चांदीमध्ये मार्च फ्युचर्सच्या व्यापारात ०.६६ टक्क्यांची वाढ झाली असून, ती प्रति किलो ६६.४७२ रुपयांवर व्यापार करताना दिसली.

अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. परदेशी बाजारात स्पॉट सोन्याचे दर ०.५ टक्क्यांनी वाढून १८४८ डॉलर प्रति औंसवर गेले होते, तर चांदीमध्ये ०.९ टक्क्यांनी वाढ झाली होती. अशी अपेक्षा आहे की येत्या काही दिवसांत सोन्याची चमक कायम राहील. बाजार तज्ज्ञांना असा विश्वास आहे की, कोरोना लसीची बातमी प्रथम अमेरिकन प्रोत्साहन पॅकेजच्या बातमीनंतर आणि नवीन अध्यक्षांच्या निवडीनंतर आली. यापूर्वी कोरोना शिखरावर सोन्याने गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला. केवळ ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत सोन्याच्या किमतीत सुमारे ८००० रुपयांची वाढ नोंदली गेली. येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये चढउतार होऊ शकतात. (todays gold rate silver rate hike because of america joe biden know here today’s rate of gold and silver)

महत्त्वाच्या शहरांमधील सोन्याचे भाव

सोन्याचा भाव आज काल

नागपूर ४८११० ४८१००

पुणे ४८११० ४८१००

नाशिक ४८११० ४८१००

नवी दिल्ली ४७९२० ४७९१०

हैद्राबाद ४७९२० ४७९१०