Gold Rates : सोनं-चांदी पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसात सोन्याच्या भावात घसरण झाली होती. परंतु, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि.1) जागतिक बाजारातील सकारात्मक घडामोडींचा परिणाम देशातील सराफा बाजारावरही झाल्याने सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. दिल्लीत सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे भाव 241 रुपयांच्या तेजीसह 45 हजार 520 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. मागील सत्रात सोने 45279 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदीही 781 रुपयांच्या तेजीसह 68 हजार 877 रुपये प्रति किलो झाल्याचे दिसून आले.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1753 डॉलर प्रति औंस आणि चांदी तेजीसह 26.90 डॉलर प्रति औंसवर पोहोचली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लि. म्हणजेच आयबीजेएनुसार सोन्याचे आजचे दर पुढीलप्रमाणे आहेत. 24 कॅरेट- 4,598 रुपये, 22 कॅरेट- 4,441 रुपये, 18 कॅरेट- 3,678 रुपये, 14 कॅरेट- 3,057 असे आहेत. वायदा बाजारात सोमवारी सोने 241 रुपयांच्या तेजीसह 45977 रुपये प्रति 10 ग्रॅम पोहोचले. मल्टि कमोडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिल महिन्यात डिलिव्हरी मिळणाऱ्या सोन्याची किंमत 241 रुपये म्हणजेच 0.53 टक्के तेजीसह 45977 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. यात 13 हजार 545 लॉटचा व्यवहार झाला. विश्लेषकांनी म्हटले की, व्यापाऱ्यांकडून ताजा सौद्यांच्या खरेदीमुळे सोने वायदा किंमतीत तेजी आली. व्यवहारादरम्यान आंतरराष्ट्रीय बाजार न्यूयॉर्कमध्ये सोने 1.30 टक्के तेजीसह 1751.20 प्रति औंस सुरु होता.