राशी भविष्य : ‘या’ राशीला होणार ‘धनलाभ’, ‘या’ राशीच्या जीवनात मात्र ‘कौटूंबिक’ कलह

पोलीसनामा आनलाइन टीम


मेष –
मेष रास असलेल्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता आहे, या राशीच्या लोकांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. ऊर्जापूर्ण रास असलेल्या या राशीतील लोकांचे आजची अनेक प्रलंबित राहिलेली कामे मार्गी लागतील. या राशीच्या व्यक्तीने खर्चावर नियंत्रण ठेवावे, कौटूंबिक तणाव वाढू शकतो. कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगले दिवस आहेत.


मिथून –
कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता आहे, चूकीच्या लोकांच्या संगतीत राहत असल तर नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणताही विचार न करता चांगल्या व्यक्तीचा सल्ला न घेता काम करु नये. व्यापारात फायदा होण्याची शक्यता आहे.


वृषभ – दिवसाची सुरुवात आनंदाने होईल. व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरी करत असाल तर कामाची प्रशंसा होईल, तुमच्या पेक्षा वयस्कर लोकांशी बोलताना स्वता:वर नियंत्रण ठेवा.


कर्क – नव्या योजनेची सुरुवात आज करु नका, पगारापेक्षा आधिक खर्च येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. अचानक एकाद्या जवळच्या व्यक्तीची किंवा नातेवाईकाची भेट होऊ शकते. व्यवसायात किंवा नोकरीत समस्येचा सामना करावा लागू शकतो.


कन्या – नातेवाईक आणि मित्र परिवाराची जबाबदारी स्वताच्या अंगावर घेऊ नका, तुमच्या कामाकडे आधिक लक्ष द्या. कुटूंबात अचानक कोणाची तरी तब्येत बिघडू शकते. पैशाचा जास्त खर्च होऊ शकतो. यामुळे तुम्हाला मानसिक ताण देखील येऊ शकतो.


सिंह –
उगाचच जास्त तणाव घेऊ नका, तो तुमच्यासाठी चांगला ठरणार नाही. फिरायला जाण्याचा कार्यक्रम बनवू शकतात. आवश्यक कामे पूर्ण होणार नाहीत. यामुळे समस्या उद्भवू शकतात. कोणाचे चांगले केले तरी तुम्हाला यश येणार नाही. कोणीही विचारल्याशिवाय कोणत्याही प्रकराचा सल्ला देऊ नका.


वृश्चिक – गुंतवणूक करताना जपून गंतुवणूक करा. पती पत्नीने एकमेकांना सल्ला घेऊन मग कोणतेही कार्य करा. कोर्टाची पायरी चढावी लागू शकते. काही जुने मित्र तुम्हाला संकटात टाकू शकतात. खरे बोलण्याचा तुमचा स्वभाव तुम्हाला घातक ठरु शकेल. विचारपूर्वक बोला.


धनू – आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या कार्यात यशस्वी बनवेल. दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्या, कौटूंबिक वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्या.


तुळ – बोलताना व्यवहार करताना सावधानता बाळगा, संध्याकाळी मित्राची किंवा पाहुण्याची भेट होऊ शकते. कोणाशीही मतभेद होणार नाही यांची काळजी घ्या.


कुंभ –
मित्रांमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्या पदोनत्ती बाबत तुमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करा, आजचा दिवस शुभ आहे. जर व्यवसायात कोणताही करार करणार असाल तर आजच करा. स्पर्धेत तुम्हाला यश मिळेल. विवाहासाठी साथीदार मिळेल.


मकर –
आज तुम्ही लोकांच्या आकर्षणाचे केंद्र असाल. वेळेत सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. तुमच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा फायदा होईल. परंतू यात तुम्ही तुमचे नुकसान करुन घेऊ नका.


मीन – विवाहाच्या प्रस्तावासाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. नवे काम करण्यासाठी कर्ज घ्यावे लागेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ योग्य आहे. तुमचे काम वेळेत बंद करा.

ज्योतिषी आर एच सोनी
मो. न.8888899905
7447787791
Email.sayepic.com

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like