इंधन दरात आणखी वाढ; पेट्रोलने केली नव्वदी पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कच्च्या तेलाची निर्यात करणारा जगातील सर्वात प्रथम क्रमांकाचा देश सौदी अरेबियाने आपल्या उत्पादनामध्ये घट केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होत आहे. सध्या कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ५० डॉलर रुपये आहे. दरम्यान, आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ८४.७० रुपये प्रतिलीटर वर पोहोचला आहे. सध्याची वाढ पाहता पेट्रोल आणि डिझेलचे दर आगामी दोन दिवसांमध्ये ८५ रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंबईत पेट्रोलचा आजचा दर ९१.३२ रुपये आहे. तर राज्यातील परभणीत जिल्ह्यात सर्वाधिक दर म्हणजे पेट्रोल ९३.७३ रुपयांवर पोहोचले आहे.

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जानेवारी महिन्यात पेट्रोल १ रुपयांनी महागले आहे. तर डिझेच्या दरामध्ये एक रुपयापेक्षा जास्त वाढ झाली आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ८४.७० रुपये, मुंबईमध्ये ९१.३२ रुपये, कोलकातामध्ये ८६.१५ रुपये तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ८७.४० रुपये प्रतिलीटर आहे. तर दिल्लीमध्ये डिझेलचा दर ७४.८८ रुपये प्रतिलीटर, मुंबईमध्ये ८१.६० रुपये प्रतिलीटर, कोलकाता शहरात ७८.४७ रुपये प्रतिलीटर आणि चेन्नईमध्ये डिझेलचा आजचा दर ८०.१९ रुपये प्रतिलीटर आहे.

राज्यातील इंधनाचे दर
राज्यातही मागील काही दिवासांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. पुण्यात आजचा पेट्रोलचा दर ९०.९९ रुपये प्रतिलीटर आहे. तर डिझेलचा दर ८०.०६ रुपये प्रतिलीटर वर पोहोचला आहे. कोल्हापापुरात पेट्रोल ९० रुपयांच्या पार पोहोचले असून आजचा दर ९१.६० रुपये प्रतिलीटर आहे. तसेच, कोल्हापुरात डिझेलचे दर ८०.५८ रुपये प्रतिलीटर आहे.

देशातील मुख्य शहरातील पेट्रोलचे आजचे दर
आग्रा ८४.१२ रुपये प्रतिलीटर
अहमदाबाद ८४.०७ रुपये प्रतिलीटर
अलाहाबाद ८४.३८ रुपये प्रतिलीटर
भोपाळ ९२.५५ रुपये प्रतिलीटर
चेन्नई ८७.४० रुपये प्रतिलीटर
मुंबई ९१.३२ रुपये प्रतिलीटर
दिल्ली ८४.७० रुपये प्रतिलीटर
कोलकाता ८६.१५ रुपये प्रतिलीटर

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे आजचे दर
कोल्हापूर : पेट्रोल ९१.६० रुपये प्रतिलीटर, डिझेल ८०.५८ रुपये प्रतिलीटर
पुणे:पेट्रोल ९०.९९ रुपये प्रतिलीटर, डिझेल८० रुपये प्रतिलीटर
बीड९२.३७ रुपये प्रतिलीटर
परभणी ९३. ७३ रुपये प्रतिलीटर
औरंगाबाद ९२.५५ रुपये प्रतिलीटर
नाशिक ९१.७६ रुपये प्रतिलीटर
नागपूर९१.८२ रुपये प्रतिलीटर