‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात ‘घट’ सुरूच, मार्चमध्ये झालं ‘एवढं’ स्वस्त, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस आणि कच्च्या तेलाच्या दरातील घसरणी दरम्यान ऑईल मार्केटींग कंपन्या लागोपाठ पेट्रोलचे दर घटवत आहेत. शनिवारी सरकारने उत्पादन शुल्क वाढवले. प्रति लीटर पेट्रोलवर उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवले आहे, परंतु पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात सुरूच आहे.

27 फेब्रुवारीपासून दरांमध्ये सतत कपात होत आहे, याचे प्रमुख कारण कोरोना व्हायरस आहे. आज सर्व शहरांत पेट्रोलचे दर सरासरी 12 पैसे आणि डिझेलच्या दरात 15 पैशांची कपात झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 69.75 रुपये प्रति लीटर आहे. यामध्ये 12 पैशांची कपात करण्यात आली आहे. तर डिझेलचे दर 14 पैशांनी कमी करून 62.44 पैसे करण्यात आले आहेत. मार्चच्या 15 दिवसात आतापर्यंत पेट्रोल जवळपास 2 रुपयांनी स्वस्त झाले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील दर जाणून घेवूयात.

पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर
मुंबई  75.46 –  65.37
पुणे 75.35 –  64.26
अहमदनगर 76.00 –  64.90
औरंगाबाद 76.50 –  65.37
धुळे 75.88 –  64.78
कोल्हापूर 75.53 –  64.46
नाशिक 75.94 –  64.83
रायगड 75.89 –  64.75

रोज सकाळी 6 वाजता ठरतात पेट्रोल-डीझेलचे दर

प्रत्येक दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ अथवा घट होत असते. ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल – डिझेलच्या किमतींचे समीक्षण करून सकाळी 6 वाजता नव्या किमती घोषित करते. या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन डॉलर्सचे भाव यावर ठरतात. मूळ किंमतींमध्ये अबकारी कर, डीलर कमीशन यांचा समोवश असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार भारतात पेट्रोल-डिझेलचे दर बदलत असतात.

एसएमएसने मिळेल तुमच्या शहरातील इंधन दराची माहिती

तुम्हाला तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घ्यायचे असल्यास त्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावा लागेल. या क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला ही माहिती मिळू शकते. यासाठी एसएमएस पाठवण्यापूर्वी कोणत्याही पेट्रोल पंपावरून डीलर कोड घ्यावा लागेल. एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी कोड आवश्यक आहे.

कंपनी आणि क्रमांकाची सुविधा

1 इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड 92249 9 2249

2 बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड 9223112222

3 एचपीसीएल ग्राहक HPPRICE<डीलर कोड 9222201122

वरील क्रमांकावर एसएमएस पाठवून तुम्ही तुमच्या शहरातील इंधनाचे दर जाणून घेवू शकता

1 एप्रिलपासून देशात विकेल जाईल BS-VI पेट्रोल-डिझेल

देशातील सार्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने शुक्रवारी म्हटले की, आता ते BS-VI इंधन पुरवठ्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. 1 एप्रिल 2020 पासून देशात BS-VI इंधनाचा वापर लागू होणार आहे. यासोबतच ग्राहकांना BS-VI इंधनासाठी थोडी जास्त किरकोळ किंमत चुकवावी लागेल.