आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला सणासुदीत भासणार ‘पैशांची’ चणचण, अनावश्यक ‘खर्च’ टाळा

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –

meshpng
आज तुम्हाला कौटूंबिक समस्या येण्याची शक्यता आहे. नव्या कामात हातभार लावल्यास लाभ मिळेल. लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ रास –
Vrishabh
कोणतीही गोष्ट आई वडिलांपासून लपवू नका. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नव्या कामात फायदा होईल. नोकरीत तुम्हाला समस्या येण्याची शक्यता आहे.

मिथुन रास –
mithun
भर सणासुदीत पैशांची चणचण भासणार, पैसे जपून वापरा. नोकरी करणाऱ्याना दिवस चांगला जाईल. व्यवसायात चांगला लाभ होईल.

कर्क रास –
karka
प्रेमात सावधागिरी बाळगा. कुटूंबात तणाव वाढेल. आरोग्याच्या समस्या येतील. आर्थिक धोका मिळण्याची शक्यता आहे. अनेकांना कामात पदोन्नती मिळेल.

सिंह रास –
sinha
सर्वात आधी कुटूंबाची काळजी घ्या. दूर प्रवासाचा योग आहे. व्यवसायात सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. प्रेम संबंधांचे विवाहात रुपांतर होईल.

कन्या रास –
kanya
शेअर बाजारात नुकसान सोसावे लागेल. व्यवहारात सावध रहा, धोका मिळू शकतो. मिडिया आणि रिअल इस्टेट मध्ये यश मिळेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.

तुळ रास –
tula
सकाळपासून मन उत्साहित असेल. आर्थिक अडचणी येण्याची शक्यता आहे. कामात सहकार्यांच्या सहयोग मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराची साथ लाभेल.

वृश्चिक रास –
vruchik
खोटे बोलू नका, आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. सासरच्या मंडळींकडून त्रास होण्याची शक्यता आहे. पत्नीबरोबर वाद होण्याची शक्यता आहे.

मकर रास –
MAKAR
समाज सेवेत लक्ष घाला मात्र घराकडे दुर्लक्ष करु नका. यामुळेच घरात नाराजीचे वातवरण असेल. श्रम केल्यास यश मिळेल. अनावश्यक खर्चामुळे समस्या उद्भवतील.

कुंभ रास –
kumbha
संध्याकाळ पर्यंत आर्थिक लाभ होईल. सरकारी कर्मचाऱ्यांना सम्मान मिळेल. व्यापारात सावध राहून काम करा. अनावश्यक खर्च होईल.

धनू रास –
dhanu
कुटूंबातील लोकांबरोबर वाद होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. उत्साहात कमतरता वाटेल. व्यवसायात घाईत घेतलेल्या निर्णयाने नुकसान होईल. आरोग्याची काळजी घ्या.

मीन रास –
min
धार्मिक कामाने मन शांत राहिलं. दुपारनंतर धन लाभ होण्याची शक्यता आहे. पती पत्नीत तणाव राहिलं. आई वडिलांची काळजी घ्या.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like