आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या जीवनात ‘विवाह’ योग, तर ‘या’ राशीसाठी आज ‘वाहन’ खरेदीचा योग

पोलीसनामा ऑनलाईन टीम –

मेष रास –

meshpng
विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत घ्यावी लागणार आहे. मित्रांबरोबर प्रवासाचा योग आहे. तुमचे नशिब आज तुम्हाला नक्की साथ देईल. अनावश्यक खर्च टाळा.

वृषभ रास –

Vrishabh
नव्या कामाच्या शुभारंभासाठी आजचा दिवस उत्तम आहे. परंतू कोणतीही जोखीम उचलू नका. व्यवहारासंबंधित प्रकरण सावधानीने हाताळा. दुपारनंतर दिवस उत्तम आहे.

मिथुन रास –

mithun
वडीलोपार्जित संपत्तीवरुन वाद होण्याची शक्यता आहे. कोणतेही काम सहमतीने करा, धन लाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क रास –

karka
कौटूंबिक वातावरण चांगले आहे. नव्या वाहनाच्या खरेदीचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. आज समस्या उद्भवू शकतात.

सिंह रास –

sinha
आज कुटूंबात काही मंगल कार्य पार पडेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. यश मिळण्याची शक्यता आहे. धनप्रप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

कन्या रास –

kanya
प्रेमसंबंधाचे विवाहात रुपांतर होईल. वाहन खरेदीचा योग आहे. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाचे दूरगामी परिणाम असतील. चांगले आरोग्य लाभेल.

तुळ रास –

tula
व्यापारात आणि नोकरीत प्रगती होईल. प्रवासाचा योग आहे. गुंतवणूक केल्यास सफलता मिळेल. धनप्रप्तीची शक्यता आहे. उधार देण्याची वेळ येऊ शकते.

वृश्चिक रास –

vruchik
आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. बँकांची कामे सहज पूर्ण होतील. कोणतेही काम विचारपूर्वक करा. काही लोकांकडून तुमच्या कामाला प्रोस्ताहन मिळेल.

मकर रास –

MAKAR
कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रतिकूल परिस्थितीत विचारपूर्वक उत्तर द्या. दुपारनंतर तुम्हाला दिवस अनुकूल असेल.

कुंभ रास –

kumbha
व्यवसायात किंवा नोकरीत समस्या येण्याची शक्यता आहे. धनवृद्धीसाठी केलेली कामे यशस्वी होतील. नव्या कामाची सुरुवात करण्यास आजचा दिवस चांगला आहे.

धनू रास-

dhanu
कुटूंबात सुख समृद्धी येईल. व्यवसायात यश मिळेल. अनेक अडचणी दूर होतील. एखाद्या सहकार्याला मदत करण्याचा योग आहे.

मीन रास –

min
भावनिक होऊन कोणालाही वचन देऊ नका. कोणत्याही गुंतवणूकी आधी एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घ्या.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त

 

 

Loading...
You might also like