Video : आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या व्यक्तींनी ठेवा ‘रागावर’ नियंत्रण, ‘या’ राशीला ‘निळा’ रंग अशुभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम-
मेष रास –

meshpng
निर्णय घेण्यास संकोच करु नका. कोणालाही प्रश्न विचारु नका. आपल्या मित्रांवर विश्वास ठेवा. आज तुमचे एखादे मोठे काम पार पडू शकते. प्रवासाचा योग आहे.

वृषभ रास –

Vrishabh
एखादे अडून राहिलेले काम पूर्ण कराल. दुपार नंतर एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. कोणत्याही कामाबाबत प्रयत्न करत राहा.

मिथुन रास –

mithun
चांगल्या मित्रांची संगत बाळगा जे तुम्हाला संघर्षात साथ देतील. कोर्टाची पायरी चढावी लागू शकते. संध्याकाळचा वेळ कुटूंबाला द्याल.

कर्क रास –

karka
आजचा दिवस आनंदी घ्याल. आज असे काही काम करुन जाल जे तुम्हाला देखील आश्चर्यचकित करेल.

सिंह रास –

sinha
आज तुमचा दिवस आहे. त्यामुळे नवीन काम आज सुरु करा. काळा रंग आज तुमच्यासाठी शुभदायक असेल. धनप्रप्ति होऊ शकते. कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.

कन्या रास –

kanya
संघटन कौशल्याच्या माध्यमातून आज काहीतरी चांगले कराल. प्रवासाचा योग येण्याची शक्यता आहे. आज तुमच्या कल्पना साकार होतील.

तुळ रास –

tula
आज तुम्ही लोकांच्या आकर्षणाचा विषय असाल. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करु नका. खर्च वाढू शकतो जपून खर्च करा. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. नव्या कामाची सुरुवात करु नका.

वृश्चिक रास –

vruchik
सहकार्याने काम करा अन्यथा काम पूर्ण होण्यास वेळ लागेल. चिंता करु नका, संयम ठेवा. तणाव घेऊ नका.

मकर रास –

MAKAR
तुमचे जवळचेच तुमचा घात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामात लक्ष द्या. तणाव आणि चिंता मिटवण्यासाठी कुटूंबाबरोबर वेळ घालवा.

कुंभ रास –

kumbha
खासगी जीवनात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला त्रासाला समोरे जावे लागू शकते. तरी देखील तुम्ही खूप काही मिळवू शकतात.

धनू रास –

dhanu
आज सकाळ पासूनच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असेल. साथीदाराच्या मताचा विचार करा. नोकरीत तुमच्या वरिष्ठांबरोबर वाद होण्याची शक्यता असेल. शांत राहा.

मीन रास –

min
लगेचच कोणालाही मनात जागा देऊ नका, सावध राहा. रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा नुकसान होईल. सकारात्मक राहिल्यास तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज नळा रंग तुमच्यासाठी अशुभ असू शकतो.

शब्दांकन – वैभव गाटे

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

 

आरोग्यविषयक वृत्त