आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या व्यक्तींनी ‘भागीदारी’त व्यवसाय करणे टाळा, ‘समस्या’ येण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाईन टीम –

मेष रास –

meshpng
व्यवसायात लाभ मिळवण्यासाठी आजचा दिवस लाभकारी असणार आहे. आज लोक तुम्हाला मान-सम्मान देतील. दुपारी ४ नंतरचा दिवस उत्तम असणार आहे.

वृषभ रास –

Vrishabh
आज तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मान सम्मान मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

मिथून रास –

mithun
आज कामे लवकर पार पडतील, आळस मात्र झटका. प्रवासाचा योग आहे परंतू वेळेचा अपव्यय होईल. कुटूंबाची काळजी घ्या, संध्याकाळचा वेळ चांगला जाईल.

कर्क रास –

karka
भागीदारीत काम करणे टाळा. नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस उत्तम असेल. संध्याकाळनंतर आर्थिक नुकसान होऊ शकते. अपरिचीत व्यक्तीकडून फसवणूक होऊ शकते.

सिंह रास –

sinha
काम अपूर्ण राहिल्यास आधिक चिंता करु नका. मित्रांचा सहयोग मिळेल. नवे काम करणार असाल तर जोडीदाराचा सल्ला घ्या. नीळे वस्त्र आज तुम्हाला अशुभ ठरेल.

कन्या रास –

kanya
आजचा दिवस अडीअडचणींचा असणार आहे. भागीदारीत व्यवसाय केल्यास लाभ होईल. कुटूंबाचे चांगले सहकार्य लाभेल.

तुळ रास –

tula
आजचा दिवस कामातच व्यस्त असणार आहेत. अधिकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. अविवाहितांसाठी विवाहाचा योग आहे.

वृश्चिक रास –

vruchik
दुपारनंतर सुखद बातमी कानावर येईल. व्यवसायात लाभ होईल. संध्याकाळनंतर प्रवासाचा योग आहे. प्रेम संबंधित तणाव निर्माण होऊ शकतो.

मकर रास –

MAKAR
प्रेम प्रसंगात बदनामी होईल. अचानक धनलाभ होईल. मित्राबरोबर वाद होऊ शकतो. विचारपुर्वक काम करा नक्की यश मिळेल. तब्येत खराब होण्याची शक्यता आहे.

कुंभ रास –

kumbha
तुमच्या कोणत्याही निर्णयामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्या. अनेक कामं मार्ग लागतील. नोकरीत पदोन्नती मिळेल.

धनू रास –

dhanu
वडिलधाऱ्यांची सेवा करा. सामाजिक, राजकीय जीवनात यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना आधिक मेहनत करावी लागेल. धनलाभ होईल.

मीन रास –

min
व्यवसाय सुरु करण्यास आजचा दिवस चांगला आहे. कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागू शकतात. कुटूंबातील लोकांचा सहयोग मिळेल. सहचारीनीशी वाद होण्याची शक्यता आहे.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त

 

 

Loading...
You might also like