आजचे राशीभविष्य – ‘शनि’ची उपासना केल्यास ‘या’ राशीला आजचा दिवस ‘फलदायी’

पोलीसनामा ऑनलाईन टीम –

मेष रास –

meshpng
आजचा दिवस तुम्हाला अत्यंत आनंदी जाईल, तुमच्या कामासाठी आजचा दिवस चांगला असेल. वादापासून सावध राहा. धनलाभ होईल.

वृषभ रास –

Vrishabh
कौटूंबिक समस्यात गुंतून पडू नका. नोकरीच्या ठिकाणी वाद घालू नका. आज नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात फायदा होईल. तीर्थ यात्रेचा योग आहे.

मिथुन रास –

mithun
खरेदीसाठी आजचा दिवस चांगला आहे. साथीदाराबरोबरच चर्चा करुनच निर्णय घ्या. कोणालाही सल्ला देण्याचा फंदात पडू नका, समस्या उद्भवतील. मुलीच्या शिक्षणाची नवी जबाबदारी स्विकारावी लागेल.

कर्क रास –

karka
भावनिक राहू नका. धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासाची योग आहे. सूर्य उपासना तुम्हाला फलदायी ठरेल.

सिंह रास –

sinha
आनंददायी दिवस असेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. नवीन खरेदी कराल. कुटूंबाचे सहकार्य मिळेल. संध्याकाळी फिरायला जायचा योग असेल.

कन्या रास –

kanya
काळा आणि निळा रंग तुमच्या साठी अशुभ आहे. चिंता करु नका. संयम बाळगा. मेहनत करावी लागेल. कामात सहकार्य मिळेल.

तुळ रास –

tula
आळस सोडा. काही तरी नवीन करण्याची इच्छा असेल. मतभेद विसरुन काम करा.

वृश्चिक रास –
vruchik
आपल्या माणसांना वेळ द्या. आज शारीरिक समस्या उद्भवू शकते. गुंतवणूक लाभदायक ठरेल.

मकर रास –
MAKAR
मुलांच्या हट्टामुळे समस्या निर्माण होईल. रागावर नियंत्रण ठेवा, शातंतेने काम करा. कर्ज घेतलेले असल्यास समस्या उद्भवू शकते. शनि देवाची उपासना तुम्हाला या त्रासातून बाहेर काढेल.

कुंभ रास –
kumbha
प्रियजणांबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. आज समस्या उद्भवू शकतात. लोकांकडून सहकार्य मिळेल. दुपार नंतर आजचा दिवस उत्तम असणार आहे.

धनू रास –
dhanu
तणावात असल्याने जबाबदारीपूर्ण करु शकणार नाहीत. आजचा दिवस व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. कौटूंबिक ओझे तुमच्यावर येण्याची शक्यता आहे.

मीन रास –
min
आज तुमची अडून राहिलेली कामे पुर्ण होतील. आजचा दिवस उत्तम असेल. पिवळा रंग तुमच्यासाठी लाभकारी असेल. नातेवाईकांमुळे फायदा होईल.

 

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
         8888899905
Email – [email protected]

आरोग्यविषयक वृत्त