आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांना मानसिक त्रास होण्याची शक्यता

पोलीसनामा ऑनलाईन टीम –

मेष राशी

meshpng
आज आपल्यासमोर नवीन संधी सादर होणार. या राशीच्या लोकांना पडद्या मागे राहून काम करण्याची सवय नसल्याने समोर येऊन काम करावं लागेल आणि तणावही जाणवेल. काल केलेल्या चुकांचे भुगताना आज करावे लागणार आहे. दुपार नंतर दिवस शुभ आहे. संयम ठेवणे गरजेचे आहे. ज्या प्रतिभेला तुम्ही आवड समजत होतात तीच आता तुमच्या उपजिविकेसह साधन बनणार आहे

वृषभ राशी

Vrishabh
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तार चढावाचा असेल परंतु लवकरच यातून तुमची सुटका होईल. नेहमी प्रमाणे दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. नोकरी संदर्भात काही अडचणी असल्यास त्यामध्ये बदलावं होण्याची शक्यता आहे. जो तुम्हाला योग्य दिशेत घेऊन जाईल यासाठी तुम्हाला काही जोखिम घेण्याची गरज आहे. कुटुंबाची काळजी घ्या.

मिथून

mithun
या राशीच्या लोकांसाठी आज त्यांचे कलागुण दाखवण्याचा उत्तम दिवस आहे. यामुळे लोकांना तुमच्या प्रति प्रतिक्रिया बदलाव्या लागतील. अशा प्रसंगाचा फायदा नक्की घ्या ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. प्रेम संबंधाचे प्रकरण चिघळू शकतात. लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला तडजोड करावी लागेल जे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.

कर्क

karka
आजचा दिवस तुमच्यासाठी बदल घडवणारा दिवस असेल. तुमची भेट एक अशा व्यक्तीशी होऊ शकते जो तुमच्या बदलाचा कारण बनेल. तुम्ही स्वतः हा कोणत्याही सामाजिक वादात पडू नका ज्यामुळे मानसिक त्रास वाढण्याची शक्यता आहे. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. आज अनेक समस्या तोंड वर करतील ते विचारपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करा.

सिंह

sinha
काही दिवसांपासून जो खर्च वाढत होता तो कमी होईल परिस्थिती बदलेल ज्यामुळे कमाई ही वाढेल. घाईत घेतलेले निर्णय त्रास दायक ठरू शकतील. कोणत्याही कामात सावधगिरीने पावले उचला. एकट्याला वेळ घालवण्याची इच्छा असेल तर कोणाला तरी सोबत ठेवण्याचं प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रात काही दिवसांपासून सुरु असलेली कोंडी दूर होईल.

कन्या

kanya
कन्या राशीचे लोक लहान लहान गोष्टी लक्षात ठेवत आपली महत्त्वाची कामे करून घ्या. महत्त्वपूर्ण लोकांसोबत संपर्क वाढणार. कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. आधी ठरलेल्या कामांमध्ये फेरबदलाव करावा लागेल. कुटुंबात अचानक एखाद्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते त्यावर लक्ष द्या.

तुळा

tula
कार्यक्षेत्रात बढती होणार आहे. प्रेम आणि जीवन साथी तुम्हची ताकत बनणार आहे याची काळजी नका करू. व्यवसायात धन लाभाची संभावना आहे. विद्यार्थी वर्ग आज काही गोष्टीना घेऊन चिंतेत असतील. शरीरात कमजोरी जाणवेल. प्रेमातही यश न मिळाल्याने निराशाचा सामना करावा लागेल.

वृश्चिक

vruchik
पैशांच्या स्थितीत सुधारणा दिसेल. नवीन काम सुरु करण्याचे योग येतील. वायफट खर्च टाळा. करियर मध्ये अडथळा येऊ शकतो. शत्रूपासून चार हात लांब राहा. अभ्यासाची इच्छा नाही होणार. आरोग्याची काळजी घ्या. सूर्यास्तानंतरचा वेळ तुमच्यासाठी शुभ असेल.

धनु

dhanu
आपल्या स्वभावाप्रमाणे आज आपण काही नवीन गोष्टी शिकाल. पैशांचे देवाणघेवाणा डोके दुखी बानू शकेल पण यात यश मिळू शकेल. जुन्या गोष्टी सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. अशी परिस्थिती समोर येईल ज्यामुळे तुम्हचे विचार बदलू शकतात. प्रेम संबंध दृढ होतील. गौशाळेला दान करा. अविवाहित लोकांचे प्रेम संबंध तुटू शकतात. आरोग्यही सुदृढ राहील. आज आपल्या जीवनात काय सकारात्मक आणि काय नकारात्मक आहे याचा विचार करा.

मकर

MAKAR
आज या राशीचे लोक खूपच व्यस्थ असतील. काही प्रसंगी सांभाळून राहण्याची गरज आहे. उच्च पद मिळण्याची इच्छा तीव्र होणार आहे. आपल्या कंदील गोष्टी आपल्या पुरते ठेवा. आरोग्य निरोगी राहणार. कोणत्याही वस्तूची चोरी होण्याची शक्यता आहे तर सावध राहा. व्यायसायात किंवा कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

 

कुंभ

kumbha
जुन्या अडचणी मित्रांच्या मदतीने दूर करा यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. मालमत्ता संदर्भातील कामे लक्ष पूर्वक करा. आज तुमच्या हातातून महत्त्वाचे काम टाळू शकता. आळसमुळे समस्या निर्माण होऊ शकतात. स्तुती आणि नकारात्मक विचारामुळे कामे बिघडू शकतात.

मीन राशी

min
आपल्या गोष्टी इतराना सांगू नका. यामुळे फायदा होऊ शकतो. काही गोष्टींमध्ये यामुळे समस्याही निर्माण होऊ शकतात. साथीदारावर विश्वास ठेवा. एकमेकांसोबत वेळ घालवा. महिलांना कंबरेच्या खालील भागाचे त्रास उदभवू शकतात. डोळ्यांची समस्याही होऊ शकतात. मुलांसाठी वेळ काढा. धन लाभाचा योग आहे.

 

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
         8888899905

Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त –