home page top 1

गरम भाजीत पडून तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – गरम भाजीत पडून एका तीन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. चिकलठाणा भागातील पुष्पक गार्डन परिसरात काल रात्री ही घटना घडली हर्षल संतोष गाधू असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

मृत हर्षल हा काल रात्री घरामध्ये खेळत होता. तर त्याची आई घरकाम करत होती. हर्षलच्या आईने रात्रीचे जेवण तयार करुन खाली ठेवले होते. हर्षल खेळत असताना त्याला अचानक चक्कर आली. त्यामुळे तो गरम भाजीत पडला. यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली. हा प्रकार आईच्या लक्षात आल्यानंतर तिने त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

हर्षल याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षलच्या अचानक मृत्यूमुळे गाधू परिवार दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’

Loading...
You might also like