संतापजनक ! लग्नात आलेल्या दीड वर्षांच्या भाचीवर लैंगिक अत्याचार

आग्रा : वृत्तसंस्था – लग्नात आलेल्या दीड वर्षांच्या चिमूरडीवर मामाने लैंगिक अत्याचार करत तिला लग्न मंडपापासून जवळच असलेल्या एका झुडुपात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी मंडपापासून जवळच असलेल्या एका झुडुपात बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

पिडीत मुलगी आपल्या आईसोबत आग्र्यात एका लग्नाला आली होती. यावेळी तिचा मामा तिला घेऊन गेला. बराच वेळ ती न आल्याने तिच्या आईने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी ती मंडपापासून ४०० मीटर अंतरावर असलेल्या एका झुडुपात तिचा मृतदेह आढळला.

मामाने तिला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तो तिला रक्कबंबाळ अवस्थेत टाकून तसाच पसार झाला. ती सापडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या महिलेच्या कुटुंबियांनी हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला.

महिलेला मुलीसोबत तात्काळ मंडपातून पाठवून देण्यात आले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला वैद्यकिय चाचणीसाठी पाठवून देण्यात आले. त्यानंतर आरोपीवर बलात्कार आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला.