Tokyo Olympic 2020 | ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याच्या आनंदात महिला अ‍ॅथलीटच्या तोंडातून निघाली ‘शिवी’, पाहा व्हायरल व्हिडीओमध्ये काय म्हणाली ती

टोकियो : Tokyo Olympic 2020 | जपानच्या (Japan) टोकियो ऑलम्पिक 2020 (Tokyo Olympic 2020) ची सध्या संपूर्ण जगात चर्चा आहे. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर टाळ्यांचा कडकडाट होत आहे. सोबतच खेळाडू सुद्धा आपल्या विजयाचा उत्साह साजरा करत आहेत. परंतु ऑस्ट्रेलियाची स्वीमर कायली मॅकेओन (Kaylee Mckeown) आपल्या विजयाच्या आनंदात इतकी एक्सायटेड झाली की ती माईकवरच काही असे बोलून गेली, ज्यामुळे तिचा व्हिडिओ वायरल होत आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

कायलीने 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण पदक जिंकले आणि सोबतच जागतिक विक्रम सुद्धा तोडला आहे. 19 वर्षाच्या कायलीने फायनलमध्ये हा विक्रम केवळ 57.45 सेकंदात केला. आपला विजय आणि वर्ल्ड रेकॉर्ड बनवल्याने कायली इतकी एक्सायटेड झाली की जेव्हा तिला इंटरव्ह्यूत विजयाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती असे शब्द बोलून गेली, जे ऑलम्पिक सारख्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर कुणी वापरले नसतील.

 

 

इंटरव्ह्यू घेणार्‍या व्यक्तीने कायलीला विचारले की, विजयाबाबत आपली आई आणि बहिण यांना काय सांगायचे आहे, तेव्हा यावर कायलीच्या तोंडातून एक्सायटमेंटमध्ये शिवी निघून गेली. आपल्या या शब्दांमुळे नंतर कायली नर्व्हस झाली आणि तिने आपले तोंड दाबले आणि नंतर शब्द सावरण्याचा प्रयत्न करत म्हटले, ‘ओ शिट! हे मी काय बोलले.’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

तिचा हा व्हिडिओ आता वायरल होत आहे आणि मोठ्या प्रमाणात शेयर सुद्धा केला जात आहे.
ट्विटरवर तिचा व्हिडिओ शेयर करत एका पत्रकाराने लिहिले, मी या व्हिडिओसोबत ऑलम्पिकचे बेस्ट डेली मुव्हमेंट्स सुरू करत आहे.
लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, कमेंटही करत आहेत.

लोकांचे म्हणणे आहे की हा या ऑलम्पिकचा सर्वात चांगला क्षण आहे.
एका यूजरने म्हटले, व्हिडिओ पाहून मला हसू आवरत नाही. तर एका यूजरने लिहिले की, जर सुद्धा सुवर्ण जिंकले असते तर असाच एक्सायटमेंटमध्ये वेडा झालो असतो.

Web Titel : tokyo olympic 2020 swimmer kaylee mckeown uses abusive word in excitement after winning gold video viral

 

हे देखील वाचा

Modi Government | अधिकार्‍यांच्या कामाचा आढावा घेणार मोदी सरकार, 50 वर्षांवरील अकार्यक्षम ऑफिसरला करणार सेवानिवृत्त !

Gold Price Today | सोन्याच्या दरात 123 रुपयांची ‘घसरण’, चांदी झाली 206 रुपये ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर
Pune Crime | पुण्यात 400 गुंतवणूकदारांची 16 कोटींची फसवणूक ! महेश लोहिया, सुनील सोमाणी, गजानन मानेनंतर चार्टर्ड अकाऊंटंट (CA) कैलास मुंदडाला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक