Tokyo Olympics 2020 | मीराबाईच्या ‘चांदी’च्या झळाळीचे रेल्वे मंत्र्यांनी केले कौतूक, 2 कोटी रुपयांसह प्रमोशन देण्याची घोषणा (Video)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था टोकियो ऑलम्पिक (Tokyo Olympics) मध्ये सिल्व्हर मेडल मिळवणारी भारतीय खेळाडू मीराबाई चानू (Mirabai Chanu) सोमवारी देशात परतली. येथे परतल्यानंतर भारतीय रेल्वेने (Indian Railways) या उत्कृष्ट कर्मचार्‍याचे कौतूक केले. भारताचे नवीन रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव (railway minister ashwini vaishnaw) यांनी तिला ऑलिम्पिकचे (Tokyo Olympics) वेटलिफ्टिंगमधील सिल्व्हर मेडल जिंकल्याबद्दल सन्मानित केले.

मीराबाई चानूने 49 किलोग्रॅम महिला गटात वेटलिफ्टिंगमध्ये रजत पदक जिंकले आहे. तिने ही कमाल 202 किलोचे वजन उचलून केली. मीराबाईने स्नॅच राऊंडमध्ये 87 किलो तर क्लिन अँड जर्कमध्ये 115 किलोचे वजन उचलले होते.

रेल्वेमंत्र्यांनी ट्विट करून रेल्वेकडून तिला 2 कोटी रुपये आणि प्रमोशन देण्याची घोषणा केली. रेल्वे मंत्र्यांनी म्हटले की, तिने टॅलेंट आणि हार्डवर्कने कोट्यवधी भारतीयांना प्रेरित करण्याचे काम केले आहे.

रेल्वेपूर्वी क्रीडा विभागाने केला सन्मान

भारतीय रेल्वेच्या अगोदर क्रीडा मंत्रालयाकडून मीराबाई चानूला सन्मानित करण्यात आले.
तिचा सन्मान म्हणून क्रीडा मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांच्यासह माजी क्रीडामंत्री किरेन रिजिजू,
सर्बानंद सोनोवाल आणि जी कृष्ण रेड्डी इत्यादी उपस्थित होते.

मीराबाईने यांना दिले टोकियो यशाचे श्रेय

टोकियोमध्ये आपल्याला मिळालेल्या यशाचे श्रेय मीराबाई चानूने क्रीडा मंत्रालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.

Web Title : tokyo olympics 2020 21 | tokyo olympics 2020 indian railways felicitated mirabai chanu announced rs 2cr for weightlifter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Betel Leaf | केवळ माउथ फ्रेशनर नव्हे तर आरोग्यासाठीही पान आहे फायदेशीर; कसे ‘ते’ जाणून घ्या

Pune News | श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती आता एका आगळया वेगळ्या रुपात; अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी

Benefits of banana curd | ‘या’ वेळी खा दही-केळी, शरीराला मिळतील जबरदस्त लाभ, जवळपासही येणार नाहीत ‘हे’ आजार