Olympics Games आहेत शापित ? 40 वर्षानंतर खेळाच्या आयोजनाला लागतं ग्रहण, इतिहास ‘साक्षीदार’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – जगातील सर्वात मोठी स्पर्धा समजल्या जाणाऱ्या ‘ऑलंपिक गेम्स”वर आता समस्येचे वादळ घोंगावताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा जगभर होणार प्रसार आणि त्याचे महाभयंकर रूप लक्षात घेता टोकियो ऑलंपिक २०२० स्पर्धा स्थगित होऊ शकते. सध्या कारण जरी कोरोनाचे असले तरी इतिहास साक्षी आहे, ऑलंपिक स्पर्धेला जणू शापच आहे. प्रत्येक ४० वर्षानंतर खेळली जाणारी ऑलंपिक स्पर्धा काही ना काही कारणामुळे संकटात सापडते.

जपानचे उपपंतप्रधान तारो यांचे म्हणणे आहे की टोकियो ऑलिम्पिक २०२० शापित आहे आणि 1940आणि 1980 च्या ऑलिम्पिकप्रमाणेच घडत आहे. त्यांनी म्हंटले आहे की “ही एक समस्या आहे जी प्रत्येक ४० वर्षांत उद्भवते. ही ऑलंपिक स्पर्धा शापित आहे आणि ही वस्तुस्थिती आहे”.

जाणून घेऊया की जपानच्या मंत्र्यानी असे का म्हंटले ? त्याच्या पाठीमागे नक्की काय कारण आहे? खरच ऑलम्पिक स्पर्धांवर दर ४० वर्षाने संकट येते की हा केवळ योगायोग आहे ?

टोकियो ऑलम्पिक 1940

1940 सालच्या ऑलम्पिक स्पर्धांचे आयोजन टोकियो मध्ये करण्यात आले होते. त्याची पूर्ण तयारी देखील करण्यात आली होती. 1932 मध्ये याची जबाबदारी जपान कडे देण्यात आली होती. २१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत त्याचे आयोजन करण्यात आले होते. याच्या ठीक एक वर्ष आधी १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती जे 1945 पर्यंत चालू होते. आणि त्यामुळे ही ऑलम्पिक स्पर्धा रद्द करण्यात अली होती .

मोस्को ऑलंपिक 1980

1980 मध्ये प्रथमच युरोपला ऑलिम्पिक खेळ आयोजित करण्याची जबाबदारी देण्यात आली. रशियाने हे ऑलिम्पिक केले, परंतु मोठ्या देशांनी यात भाग घेतला नाही आणि त्यावर बहिष्कार घातला. 1956 च्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर प्रथमच असे घडले होते. ऑलिम्पिकमध्ये कमी देशांनी भाग घेतला होता. अमेरिकेसह 66 देशांनी यात बहिष्कार टाकून सहभाग घेतला नव्हता.

टोकियो ऑलंपिक 2020

कोणत्या ना कोणत्या कारणास्तव दर 40 वर्षांनी ऑलंपिक आयोजित करण्यात समस्या आली आहे. पहिल्या दोन ऑलंपिक पैकी एक रद्द करावा लागला आणि दुसर्‍यात मोठ्या देशांनी त्यावर बहिष्कार टाकला. आता कोरोना विषाणूमुळे 2020 ची टोकियो ऑलंपिक स्पर्धा अडचणीत सापडली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता जुलै महिन्यात नियोजित वेळेत हे आयोजन करणे फारच कठीण आहे.