Tokyo Olympics | 6 कोटी रुपये अन् क्लास-1 नोकरी, गोल्डमॅन नीरजला आणखी काय काय मिळणार?

टोकयो : वृत्तसंस्था –  टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला पहिले गोल्ड मेडल (gold medal) मिळाले आहे. भालाफेक स्पर्धेत फायनलमध्ये (Men’s javelin throw) निरज चोप्रा (Neeraj Chopra) याने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला आणि त्याची ही आघडी शेवटपर्यंत कायम राहिली. टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) निरजच्या या यशामुळे संपूर्ण भारतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर हरियाणा सरकारने त्याच्यावर बक्षिसांची खैरात केली आहे.

निरजला हरियाणा सरकारच्या पॉलिसीनुसार 6 कोटी रुपये आणि क्लास -1 नोकरी दिली जाईल. तसेच खेळाडूंसाठी आम्ही पंचकुलामध्ये कौशल्य केंद्र उभारत आहोत, या केंद्रावर आम्ही निरज चोप्राची इच्छा असेल तर त्याला प्रमुख म्हणून नियुक्त करु. तसेच त्याला इतर खेळाडूंप्रमाणे 50 टक्के सवलतीमध्ये जमीन विकत घेता येईल, अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी केली आहे.

नीजने गोल्ड मेडल पटकावल्यानंतर त्याच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली. देशाचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि माझ्या मुलाने हे स्वप्न पूर्ण केल्यामुळे मी आनंदी आहे. त्याने ज्या प्रकारे मेहनत केली ते बघता त्याला गोल्ड मेडल मिळेल, असा विश्वास होता, असं निरजच्या वडिलांनी सांगितले. निरजने गोल्ड मेडल मिळवताच त्याच्या चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर जल्लोष साजरा केला.

 

Web Title : tokyo olympics 2020 gold medalist neeraj chopra to get 6 crore rupees class one job by haryana government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

EPFO Rules | PF खातेधारकांनी तात्काळ अपडेट करावी वारसदाराची माहिती, अन्यथा होईल 7 लाखाचे नुकसान; जाणून घ्या

Pune Unlock | पुण्यात सोमवारपासून निर्बंध शिथिल होणार? अजित पवार अन् उध्दव ठाकरे यांच्या चर्चा; मुख्यमंत्र्यांनी दिला ‘ग्रीन’ सिग्नल

Kolhapur Crime | वरातीत नाचताना धक्का लागल्याचा राग; युवकाला टोळक्याकडून बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल