Tokyo olympics 2020 | टोकियो ऑलंपिक ! हॉकीमध्ये भारताची स्पेनवर 3-0 ने केली मात

टोकियो : वृत्त संस्था – Tokyo olympics 2020 | ऑस्टेलियाकडून (Australia) लाजीरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय हॉकी संघ (Indian Hockey Association) आज नव्या जोमाने मैदानात उतरला आणि त्यांनी स्पेनवर 3 – 0 अशी मात करीत दुसरा विजय नोंदविला आहे. Tokyo olympics 2020 रुपिंदर पाल सिंग  (Rupinder Pal Singh) आणि सिमरनजितसिंग (Simranjit Singh)  या दोघांनी तीन गोल करुन भारताला विजय मिळवून दिला.

ऑस्टेलियाविरुद्ध भारताचा 7-1असा लाजिरवाणा पराभव झाला होता. त्यानंतरही नाउमेद न होता भारतीय संघ नव्या उमेदीने आज मैदानात उतरली. भारताने सामना सुरु झाल्यानंतर 14 व्या मिनिटाला पहिला गोल करुन 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर तिसरा क्वार्टर संपण्यास 5 मिनिटे बाकी असताना भारताने दुसरा गोल केला. भारतीय संघ आज एक वेगळीच रणनिती आखून खेळताना दिसत होती. त्यांनी स्पेनला (Spain) कोणतीही संधी मिळू दिली नाही.

तिसरा क्वार्टर संपण्यापूर्वी स्पेनला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता.
परंतु, भारताचा बचाव भक्कम राहिला. शेवटच्या सत्रात भारताने तिसरा गोल करत निर्णायक आघाडी घेतली.
रुपिंदरसिंग ने 51 व्या मिनिटांनी भारताचा तिसरा गोल केला. या सामन्यातील त्याचा हा दुसरा गोल होता.
भारताना हा सामना 3-0 अशा जिंकून स्पर्धेतील दुसरा विजय मिळविला आहे.
त्यामुळे भारताच्या उपांत्य फेरीतील आशा अजूनही जिवंत आहेत.

Web Title : Tokyo olympics 2020 | Hockey Group Stage match: India men’s team beat Spain 3-0

Pune-Bangalore Highway | शुक्रवारपासून बंद असलेली पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक आज सुरु होण्याची शक्यता

Ration Card वर मिळतील अनेक फायदे, जर अजूनपर्यंत बनवले नसेल तर ‘या’ पध्दतीनं करा अर्ज, जाणून घ्या

Post Office च्या ’या’ योजनेत फक्त 1,000 रुपये जमा करा आणि दरमहिना 4,950 रुपये मिळवा !