Tokyo Olympics 2020 | भारत आणि पाकिस्तानमध्ये सुवर्ण पदकासाठी होणार आज ‘झुंज’

टोकयो : वृत्तसंस्था – Tokyo Olympics 2020 । कोणत्याही खेळामध्ये भारत आणि पाकीस्तान (India vs Pakistan) या दोघात लढत असली की, ही एक मोठी लढत म्हटली जाते. विशेषतः ही चुरशीची देखील असते. सर्व भारतीय वासियांना या स्पर्धेचे चाहूल लागली असते. सध्या भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) क्रिकेट सामना झाला नाही. याचबरोबर हॉकीची देखील लढत नाही. मात्र, या दोन्ही देशात भालाफेक (Javelin throw) लढत होणार आहे. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये सुवर्ण पदकासाठी (Gold medal) दोन्ही देशांचे खेळाडू परस्पर (Tokyo Olympics 2020) समोर येणार आहेत. हा सामना आज शनिवारी दुपारी होणार आहे. त्यामुळे शनिवार हा महत्वाचा दिवस आहे.

आजच्या लढतीत भारताचा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम (Arshad Nadeem) हे दोघे सुवर्ण पदकासाठी (Gold medal) मैदानात उतरणार आहेत. तसेच, या दोघांनीही आपल्या संघात चांगली कामगिरी करत पदक (Gold medal) पटकवण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, भारताचा स्टार असणारा खेळाडू नीरज चोप्रानं 86.65 मीटर भालाफेक करत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच, पाकिस्तानचा अर्शद नदीम याने 85.16 मीटर भालाफेक (Javelin throw) करत तिसरा क्रमांक संपादन केला आहे. मुखतः म्हणजे ग्रुप A मध्ये तसेच, अर्शद ग्रुप B मध्ये होता.

दरम्यान, भारत देशाने एथलेटिक्समध्ये (Athletics) आजतागायत एकदाही ऑलिम्पिक पदक पटकावलं नाही.
मात्र, आज भारताला पदक मिळण्याची अपेक्षा आहे.
यंदा विजयी तलवार भारताचा नीरज चोप्रा हातात घेईल का? या उत्सुकतेत सर्व भारतीय देशवासीय आहेत.
याचबरोबर अर्शदकडून पाकिस्तानलाही हीच अपेक्षा आहे.
आता ऑलिम्पिकमध्ये या दोघांत चुरशीची झुंज बघायला मिळणार आहे.

Web Title :- tokyo olympics 2020 neeraj chopra arshad nadeem javelin throw final clash between india vs pakistan for gold medal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

High Court | वडिलांचेच नव्हे, आईचेही आडनाव वापरू शकतात मुले : दिल्ली उच्च न्यायालय

Earphone Burst | जुन्या गॅझेट्सचा वापर करत असाल तर रहा सावध, गाणे ऐकताना कानात फुटला ईयरफोन, तरूणाचा मृत्यू

High Court | पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणे वैवाहिक बलात्कार, घटस्फोटासाठी हे ठोस कारण – उच्च न्यायालय