Tokyo Olympics 2020 | नीरज चोपडा याने पहिल्याच ‘भालाफेकी’त रचला ‘इतिहास’ फायनलमध्ये मिळविले स्थान

टोकियो : वृत्त संस्था – Tokyo Olympics 2020 | टोकिओ ऑलंपिकमध्ये आज सकाळीच एक आनंदाची बातमी आली आहे. भारताचा स्टार अ‍ॅथलिट नीरज चोपडाने (Neeraj Chopra) आपल्या पहिल्याच भाला फेकीत नवा इतिहास रचला आहे. भाला फेकीच्या पात्रता फेरीतील ग्रुप अ गटात त्याने बुधवारी सर्वाधिक लांब 86.50 मीटर भाला फेकून फायनलमध्ये स्थान मिळविले. १२ खेळाडुंमध्ये तो अग्रस्थानी राहिलाच, त्याचबरोबर त्याने भारतासाठी एक इतिहास रचला. Tokyo Olympic आता फायनल ७ ऑगस्टला होणार आहे.

आशियाई, राष्ट्रकुल आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये (Asian Championships) सुवर्ण पदक विजेता चोपडा (Gold medalist Neeraj Chopra) याने पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये स्थान मिळविल्यानंतर पुढील दोन प्रयत्न न करण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक फेरीत तीन वेळा संधी मिळते. त्यात जो प्रयत्न सर्वाधिक असतो, तो गृहित धरला जातो.

ऑलंपिक इतिहास कोणीही भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये (Indian Athletics) आजवर पदक मिळवून शकले नाही. नीरज चोपडा (Neeraj Chopra) हा दुष्काळ संपवू शकतो.
फायनलमध्ये त्यांला प्रामुख्याने जर्मनीचा जोहानेस वेटर (85.64 मीटर) आणि फिनलँडचा लेसी एटलेटोलो (84.50) यांचे आव्हान असणार आहे.

Web Title :  Tokyo Olympics 2020 | Neeraj Chopra made his debut in ‘Javelin’ and made it to the ‘History’ final.