Tokyo Olympics 2021 | भारताची हॉकीमध्ये न्यूझीलंडवर 3-1 असा शानदार विजय; टोकिओ ऑलंपिकमध्ये दमदार सुरुवात

टोकिओ : वृत्त संस्था – Tokyo Olympics 2021 |टोकिओ ऑलंपिकच्या आजच्या दुसर्‍या दिवशी हॉकीमध्ये भारताने न्यूझीलंडवर ३-१ असा शानदार विजय मिळविला भारताच्या विजयाचा हरमनप्रीत (Harmanpreet) हिरो ठरला. त्याने २ गोल केले. टोकिओ ऑलंपिक (Tokyo Olympics 2021) हॉकी सामना सुरु होताच भारत आणि न्यूझीलंडकडून (New Zealand) पेनल्टी कॉर्नरवर प्रत्येकी एक -एक गोल केला गेला, मध्यंतरापर्यंत १-१ अशी बरोबरी होती.

मध्यंतरानंतर सामना सुरु होताच हरमनप्रीत याने पेनल्टी कॉर्नरवर (Penalty Corner) पहिला गोल करुन भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुन्हा आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर (Penalty Corner) हरमनप्रीतने आणखी एक गोल करुन भारताला चांगली आघाडी मिळवून दिली.

सामना संपण्यास शेवटचे १५ मिनिटे राहिली असताना न्यूझीलंडच्या स्टेफिन जेनिस (Stephen Janice) याने दुसरा मैदानी गोल करुन भारताची आघाडी कमी केली. त्यानंतर न्यूझीलंडने अनेक हल्ले करुन बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते भारताचा बचाव भेदू शकले नाही.
भारताने हा सामना ३-२ अशा फरकाने जिंकून चांगली सुरुवात केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page , Follow us instagram 
and Twitter for every update

Web Title : Tokyo Olympics 2021 |  India’s 3-1 win over New Zealand in hockey