Tokyo Olympics | बॉक्सिंगमधून भारतीयांना खुशखबर ! लोव्हलिना बोगोर्हेनने केले पदक निश्चित

टोकिया : वृत्तसंस्था – Tokyo Olympics | मेरी कोम (Mary Kom) हिच्या आश्चर्यकारक पराभवानंतरही बॉक्सिंगमध्ये भारतासाठी आज सकाळी एक खुषखबर मिळाली आहे. (Tokyo Olympics) महिला वेल्टरवेट (६४ – ६९) लोव्हलिना बोगोर्हेगने चायनीज तायपेईच्या चिन चिन निएनला ४-१ असे पराभूत केले असून आपल्या पदकाची निश्चिती केली आहे.

बॉक्सिंगमध्ये ऑलंपिक पदक जिंकणारी मेरी कॉम आणि विजेंदर सिंग (Vijender Singh) यांच्यानंतर लव्हलिना बोर्गाेहेन (Lovlina Borgohain) ही सध्याच्या काळातील तिसरी भारतीय बनली आहे. ती अवघ्या २३ वर्षांची आहे. पण तिने तैवानच्या माजी विश्वविजेत्या चिन चिन विरुद्ध धीराने सामना करीत तिच्यावर मात केली.

मेरी कोमनंतर भारताची बॉक्सिंगमध्ये सर्व आशा लोव्हलिनावर केंद्रीत झाली होती.
लोव्हलिना आणि तिची तैवान प्रतिस्पर्धी दोघेही आक्रमक व एकमेकांवर जोरदार मुक्का मारत होते.
पहिल्या फेरीत तिने आघाडी घेतली. दुसर्‍या फेरीत तिने ५-० गुण घेत आपली आघाडी वाढविली.
आपली ही आघाडी कायम ठेवत लोव्हलिना हिने ४-१ अशी ही लढत जिंकून आपले पदक निश्चित केले.

Web Title :- Tokyo Olympics | Boxing, Women’s Welterweight (64-69kg), Quarterfinal 2: Lovlina Borgohain beats Chinese Taipei’s Chin-Chen Nien 4-1, assured of a medal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Kisan | आता ‘या’ शेतकर्‍यांवर कारवाईची तयारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ; परत करावी लागेल रक्कम

Pune Metro | ‘तरीही तुम्ही आलाच’; उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यम प्रतिनिधींबाबत असे का म्हणाले वाचा सविस्तर

Pune Metro | ‘लवकरच प्रत्यक्ष मेट्रोत बसायला मिळावे, वनाज ते रामवाडी जून 22 पर्यंत पूर्ण करणार’ !