Tokyo Olympics | टोकियोतून आशादायक बातमी ! थाळीफेकमध्ये कमलप्रीतने दाखविली कमाल; फायनलमध्ये केला प्रवेश

टोकियो : वृत्त संस्था – Tokyo Olympics |ऑलंपिकमध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये भारतीय खेळाडुंच्या पराभवाच्या बातम्या येत असतानाच आज सकाळी सकाळी एक आनंददायक बातमी आली आहे. भारताची कमलप्रीत कौर हिने थाळीफेक स्पर्धेत कमाल दाखविली आहे. Tokyo Olympics तिने तिसर्‍या प्रयत्नात ६४ मीटर थाळीफेक करुन अंतिम फेरी प्रवेश केला आहे.

ऑलंपिकचा (Tokyo Olympics) आजचा ९ वा दिवस असून आज कमलप्रीतने शानदार प्रदर्शन केले. पहिल्या प्रयत्नात तिने ६० मीटर थाळीफेक केली होती. तिसर्‍या प्रयत्नात तिने ६४ मीटर थाळीफेक करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. थाळीफेक याच्या पात्रता फेरीत इतिहास रचणारी कमलप्रीत कौर २ ऑगस्टला अंतिम फेरीत खेळणार आहे.
कमलप्रीत कौर ही पंजाच्या श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील रहिवासी आहे.

तिने पटियाला येथे आयोजित २४ व्या फेडरेशन कप वरिष्ठ अथलेटिक्स स्पर्धेत आपल्या प्रयत्नात ६५़०६ मीटर थाळीफेक राष्ट्रीय विक्रम करुन ऑलंपिकचे तिकिट मिळविले होते.
तिने २०१२ मध्ये कृष्णा पूनियाद्वारे स्थापित केलेला ६४.७६ मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला होता.
त्याचवेळी सीमा पूनिया अंतिम फेरी पोहचू शकली नाही. ३१ स्पर्धकांमध्ये ती १६ व्या स्थानावर राहिली.

Web Title : Tokyo olympics discus thrower kamalpreet kaur ranks second in qualification advances to final 2021

Real Estate in Pune | पुण्यात रियल इस्टेटला येणार सुगीचे दिवस; झानडू रियल्टीची प्रतिष्ठित नाईकनवरे डेव्हलपर्सशी भागीदारी

Weight Lose Tips | डायटिंग अन् उपवास नव्हे तर हे केल्यानं वेगानं कमी होईल वजन, जाणून घ्या

Rajsthan | भाजपा नेत्यावर हल्ला, शेतकरी आंदोलनकर्त्यांनी केली मारहाण, कपडे फाडले (व्हिडीओ)

Protein Week 2021 | शरीरात दिसत असतील ‘ही’ 8 लक्षणे तर करू नका दुर्लक्ष, प्रोटीनच्या कमतरतेचा आहे इशारा