Tokyo Olympics | जर्मन महिला जिम्नास्टच्या कपड्यांनी का वेधले सर्वांचे लक्ष?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  टोकियो ऑलम्पिकमध्ये (Tokyo Olympics) जगभरातील खेळाडू आपली प्रतिभा दाखवत आहेत. खेळातील प्रतिभा दाखवण्यासह जर्मनीच्या महिला जिम्नास्टिक्सने जे केले, त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. जर्मन महिला खेळाडूंनी खेळाद्वारे ’फ्रीडम ऑफ चॉइस’ म्हणजे आपल्या पसंतीचे कपडे घालण्याच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्याचा (Tokyo Olympics) निर्णय घेतला.

टोक्यो ओलंपिक

रविवारी झालेल्या सामन्यात जर्मनीच्या महिला जिम्नास्टिक्स फुल बॉडी सूटमध्ये दिसल्या. खेळाडूंचे म्हणणे होते की, हे कपडे पसंतीच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणे आणि महिलांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने डिझाईन केले आहेत, जेणेकरून महिला खेळाडूंना यामध्ये सहजता जाणवू शकते.टीमच्या खेळाडू सारा वॉस, पॉलीन शेफर-बेट्ज, एलिजाबेथ सेट्ज आणि किम बुई या लाल आणि सफेद रंगाचा युनिटार्ड ड्रेस घालून मैदानात उतरल्या. हा लियोटार्ड आणि लेगिंग्जचा वापर करून बनवला होता. हे ड्रेस संपूर्ण पायांना कव्हर करत होते.

टोक्यो ओलंपिक
या टीमने आपल्या ट्रेनिंग दरम्यान सुद्धा असेच कपडे घाले होते.
21 वर्षाच्या वॉसने म्हटले, जस-जशा तुम्ही एक महिलेच्या रूपात मोठ्या होत जाता.
तसतसे आपल्या शरीरासह सहजता राखणे अवघड होते.
आम्हाला हे ठरवायचे होते की, आम्ही जे सुद्धा परिधान करू त्यामध्ये आम्हाला चांगले दिसण्यासह सहजता सुद्धा अनुभवता यावी. मग तो शॉर्ट यूनिटार्ड असो की लाँग.

टोक्यो ओलंपिक
मागील काही वर्षात खेळाच्या स्पर्धेत वाढत्या लैंगिक आणि शारीरीक शोषणाच्या अनेक प्रकरणांनी महिला खेळाडूंची चिंता वाढवली आहे.
आता अ‍ॅथलीट्सच्या सुरक्षेसाठी अनेक नवीन सेफ्टी प्रोटोकॉल सुद्धा बनवले जात आहेत.

टोक्यो ओलंपिक

टोक्यो ओलंपिक

टोक्यो ओलंपिकटोक्यो ओलंपिक

Web Title : tokyo olympics germans gymnastics full body suits freedom of choice

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Governor Bhagat Singh Koshyari | अवघ्या अर्ध्या तासात राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनी आटोपला चिपळूण दौरा; परत मुंबईला रवाना

Pune Corporation | शहरातील रस्त्यांवरील खड्डयांची जबाबदारी आमचीच – स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने

Mamata Banerjee And PM Modi | ‘पश्चिम बंगालचं नाव बदला’ ! ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट