Tokyo Olympics | शेवटच्या तीन मिनिटात केली कमाल, गत विजेत्या अर्जेटिनावर भारताची 3-1 अशी मात; उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

टोकियो : Tokyo Olympics |भारतीय पुरुष हॉकी संघाने गत ऑलंपिक विजेत्या (Olympic Winners) अर्जेटिनावर ३-१ अशी मात करीत लागोपाठ दुसरा सामना जिंकला आहे. शेवटच्या तीन मिनिटांपर्यंत सामना १-१ असा बरोबरीत असताना भारतीय संघाने (Indian Team) तीन मिनिटात दोन गोल मारुन सामना आपल्या बाजूने फिरविला.

या विजयासह भारतीय पुरुष हॉकी संघाने (Hockey Association) टोकियो ऑलंपिकमधील (Tokyo Olympics) उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळविला आहे.
या सामन्यात भारतीय संघ लयीत आढळून आला. खेळाच्या प्रारंभापासून भारताने वेगवान चाली रचत चांगली सुरुवात केली. भारताच्या बचावपटूंनी अर्जेटिना खेळाडूंना कोणतीही संधी दिली नाही.

भारताकडून वरुण कुमारे ४३ व्या, विवेक सागर प्रसादने ५८ व्या आणि हरमनप्रीत सिंह ने ५९ व्या मिनिटांनी गोल केले. तर अर्जेटिनाने ४८ व्या मिनिटाने गोल करुन सामन्यात बरोबरी केली होती.
सामना ५८ व्या मिनिटांपर्यंत बरोबरीत होता.
त्यानंतर पुढच्या तीन मिनिटाच्या अंतराने भारताने लागोपाठ २ गोल करीत सामन्यावर वर्चस्व गाजविले.

अ गटात आता भारत ऑस्ट्रेलियानंतर दुसर्‍या स्थानी आहे.
त्यांचा अखेरचा सामना ३० जुलै रोजी यजमान जपानबरोबर होणार आहे.
भारताच्या हॉकीमधील एकूण ८ सुवर्ण पदकांपैकी शेवटचे सुवर्ण पदक १९८० मध्ये मास्को ऑलंपिकमध्ये आजच्या दिवशी (२९ जुलै) मिळविले होते.

Web Title : Tokyo Olympics | Kelly Max in the last three minutes, India’s 3-1 win over defending champions Argentina; Entered the semifinals

हे देखील वाचा

Tokyo Olympics 2020 | मीराबाईच्या ‘चांदी’च्या झळाळीचे रेल्वे मंत्र्यांनी केले कौतूक,
2 कोटी रुपयांसह प्रमोशन देण्याची घोषणा (Video)

Pune News | ‘डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’चे डॉ.अरुण फिरोदिया यांच्या उपस्थितीत वितरण;
7 युवा संशोधकांचा गौरव ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी संशोधने व्हावीत : डॉ अरुण फिरोदिया

Facebook | फेसबुकवरील एका चुकीच्या टॅगमूळे पतीची ‘पोलखोल’, पत्नीला समजलं ‘गुपित’ आणि घटस्फोटाचे ‘खरे’ कारण