Tokyo Olympics | हॉकीतील 4 दशकाचा दुष्काळ समाप्त ! भारताने जर्मनीवर 5-4 ने मात करुन ‘कांस्य’ पटकाविले

टोकियो : Tokyo Olympics  | गेल्या चार दशकापासून हॉकीमध्ये (Hockey) असलेल्या दुष्काळ या  ऑलंपिकमध्ये (Olympics) संपला आहे. भारताने जर्मनीवर ५-४ अशी मात करीत कांस्य पदकावर नाव कोरले आहे. यापूर्वी भारताने मास्को  ऑलंपिकमध्ये (Moscow Olympics) १९८० मध्ये हॉकीमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.

समिरनजीत सिंह (Sameeranjit Singh) याने दोन गोल करुन उत्कृष्ट कामगिरी केली. भारताची सुरुवातीला खराब कामगिरी झाली. जर्मनीकडून (Germany) पहिला फिल्ड गोल करुन सुरुवातीलाच आघाडी घेऊन भारतावर दबाव निर्माण केला. पहिल्या र्क्वाटरमध्ये जर्मनी १-० ने आघाडीवर राहिली. दुसर्‍या र्क्वाटरमध्ये सिमरनजित ने कमाल करीत भारताचा पहिला गोल करुन बरोबरी साधली. त्यानंतर जर्मनीने एका पाठोपाठ दोन गोल करीत ३ -१ अशी आघाडी घेतली. हरमनप्रीतचा फटका जर्मनीच्या गोल किपरने अडविला तरी हार्दिक सिंहला (Hardik Singh) गोल करण्यापासून तो रोखू शकला नाही. त्यानंतर दोनच मिनिटांनी पेनल्टी कॉर्नरवर (Penalty Corner) हरमनप्रीत सिंहने गोल करुन भारताला बरोबरी करुन दिली.

दुसरा हाफ सुरु झाल्यावर दोन्ही संघ गोल करण्याचा प्रयत्न करीत होते. रुपिंदर सिंह (Rupinder Singh) यांने पेनल्टी कॉर्नर घेऊन भारताचा चौथा गोल करुन भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सिमरनजीतने आणखी एक गोल करुन भारताला ५-३ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जर्मनीने चौथा गोल करुन सामन्यात पुन्हा परतण्याचा जोरदार प्रयत्न केला.

त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले.
मात्र, कोणालाही शेवटच्या काही मिनिटांमध्ये यश आले नाही.
भारताने दुसर्‍या हाफमध्ये जी आक्रमकता दाखविली,
त्यामुळे त्यांनी जर्मनीवर दबाव निर्माण केला आणि सामना ५-४ असा जिंकला.
भारतीय हॉकी टीमच्या (Indian Hockey Team)  या यशाने देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून देशवासियांनी हॉकी टीमचे अभिनंदन केले जात आहे.

Web Title : Tokyo Olympics |  Indian men’s Hockey team brings Bronze medal home after they beat Germany, 5-4

Paytm सारख्या वॉलेटमधून सुद्धा खरेदी करू शकता ‘इश्यू’,
SEBI ने दिली परवानगी

Maharashtra Police | हातात रिव्हॉलवर घेऊन व्हिडीओ बनवणं
पोलीस कर्मचाऱ्याला पडलं महागात; तडकाफडकी निलंबन (व्हिडीओ)

Pune Bhusar Market | पुण्याच्या भुसार बाजारात आता 5 ठिकाणी ‘पे अँड पार्क’

Lalbaugcha Raja  | गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट! भक्तांनी लालबागच्या राजाचे दर्शन आणि पूजा ऑनलाइन करण्याचे आवाहन

Pregnancy | प्रेग्नंसीत ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने मुल गोरे होते का? या काळात सेक्स करावा का? जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट