बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची विजयी सुरुवात; टोकिओ ऑलपिंकमध्ये पहिल्या सामन्यात सहज केली मात

टोकिओ : TokyoOlympics |भारताला पदकाची अपेक्षा असलेल्या बॅडमिंटनपटू पी़ व्ही़ सिंधू (PV Sindhu) हिने आज महिला गटातील पहिला एकेरी बॅडमिंटन सामना सहजपणे जिंकला. सिंधू हिने इस्त्राईलच्या ( Israel) केसेनिया पोलिकापोर्वाला (Ksenia Polikarpova) ही ला २१-७ आणि २१- १० असा दोन सेटमध्ये सरळ विजयी संपादन केला. तिने हा सामना केवळ ३७ मिनिटात खिशात टाकला.(TokyoOlympics)

२६ वर्षाची आणि सहावी नामांकित सिंधू हिने आपल्या पहिल्याच सामन्यात पोलिकापोर्वाला हिने कोणतीही संधी मिळवून दिली नाही. तिने सरळ सेटमध्ये तिचा पराभव केला.

 

रोव्हर्स अर्जुन आणि अरविंद लाईटवेट डबल स्कल्सच्या दुसर्‍या फेरीत तिसरे स्थान मिळवून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

तत्पूर्वी मनु भाकर आणि यशस्विनी देसवाल पात्रता फेरीत अनुक्रमे १२ व १३ व्या स्थानी राहिल्याने
त्यांना १० मीटर एअर पिस्टल फायनलमध्ये पोहचण्यात अपयशी ठरल्या आहेत.

पदकाची अपेक्षा असलेली मेरी कोम हिचा पहिला सामना आज दुपारी होणार आहे. तर भारतीय
हॉकी संघ आज दुपारी ३ वाजता ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.

हे देखील वाचा

Income Tax | प्राप्तीकर विभागाचा दावा, दैनिक भास्कर ग्रुपने केली 700 कोटी रुपयांच्या टॅक्सची ‘चोरी’

NIV Pune Recruitment-2021 | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  TokyoOlympics | Shuttler PV Sindhu wins opening match against Ksenia Polikarpova of Israel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update