Toll Contractor | सातारा रस्ता टोल कंत्राटदाराला सरकारचा वाटा भरण्यास सहा महिन्यांची ‘सूट’

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – लॉकडाऊनमुळे (Lockdown) सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. त्यामध्ये टोल कंत्राटदारांचेही (Toll Contractor) नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्रीय भूपृष्ठवहन मंत्रालयाने (Union Ministry of Land Transport) आणि अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) देशातील टोल कंत्राटदारांना (Toll Contractor) नुकसानभरपाई (Compensation) देण्याचे धोरण ठरवले.

नगरमध्ये महापौर, उपमहापौर निवडीपूर्वीच शिवसेनेत ‘राडा’ ! दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

त्यानुसार टोलबंदीचा काळ आणि नंतर वाहतूक पूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत ९० टक्के होत नाही, तो पर्यंत नुकसानीच्या प्रमाणात टोल कंत्राटदारांना नुकसानभरपाई (Compensation) देण्याचे निकष ठरवले आहे.यामुळे नुकसान भरपाई म्हणून पुणे-सातारा रस्त्याच्या (Pune Satara Raod) टोल कंत्राटदाराला टोलच्या रकमेतील सरकारचा वाटा भरण्यास सहा महिन्यांसाठी सूट देण्यात आल्याचे माहिती अधिरातून उघड झाले आहे. दरम्यान, टोल रकमेतील सरकारचा वाटा भरण्याची सूट ही एप्रिल ते सप्टेंबर २०२० दरम्यान दिली असल्याचे समोर आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

१ ऑक्टोबर २०१० रोजी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या (Pune Satara National Highway) सहा पदरीकरणाचे काम सुरू झाले. वास्तविक हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु हे काम अद्याप सुरु आहे. या कामाला सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) national highway authority of india मुदतवाढ दिली आहे.महामार्गावरील Highway अपूर्ण कामामुळे गेल्या ११ वर्षात अनेक अपघात झाले असून अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. अपूर्ण काम असतानाही टोल कंत्राटदाराला दरवर्षी टोलचे दर मात्र वाढवून देण्यात येत आहेत. अपूर्ण कामासंदर्भात यापूर्वी प्राधिकरणाने अनेकवेळा कंत्राटदाराला नोटीसा दिल्या आहेत, मात्र तरीही कामे प्रलंबीतच आहेत.

Toll Contractor | relief for six months for the toll contractor to pay the governments share of the toll

यांसंदर्भात बोलताना सजग नागरीक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Welankar,
President of Sajag Nagarik Manch) म्हणाले, लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसापासून
उद्योगधंद्यांपर्यंत सर्वांनाच फटका बसला आहे. हा फटका सर्वानी अँक्ट ऑफ गॉड म्हणून सहन केला
आहे. मात्र , केवळ टोल कंत्राटदारांनाच नुकसान भरपाई देणे म्हणजे इतरांवर अन्याय करण्यासारखे
आहे. असे त्यांनी म्हंटले आहे.

हे देखील वाचा

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन

Pimpri Crime News | ‘तुमच्या मुलाबरोबर एकाच ताटात जेवलोय’ सांगणार्‍याने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील गंठण लांबविले

कामाच्या गोष्टी ! 1 जुलैपासून बदलतील बँकिंग, LPG, टॅक्ससह अनेक नियम, इथं वाचा संपुर्ण अपडेट

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Toll Contractor | relief for six months for the toll contractor to pay the governments share of the toll

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update