कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना आजपासून टोल ‘फ्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना मुंबई – गोवा आणि मुंबई – पुणे, कोल्हापूर महामार्गावरील टोल आजपासून माफ करण्यात आला आहे. ही सवलत येत्या १२ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणावर गणपतीसाठी मुंबईतून भावीक जात असतात. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम अनेक ठिकाणी सुरु आहे.

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या लोकांना एक स्टिकर दिले जाणार आहे. त्या टोल नाक्यावर दाखविल्यावर त्यांना टोल भरावा लागणार नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक जण पुणे- कोल्हापूरमार्गे तळकोकणात जातात. मुंबई-गोवा महामार्ग तसेच मुंबई-पुणे, कोल्हापूर-कागल या महामार्गावरही कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल द्यावा लागणार नाही.

पर्यायी वाहतूक व्यवस्था –

मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील कळंबोली -पळस्पे फाटा येथून जाणाऱ्या वाहनांनी कळंबोली, पनवेल बायपास डी पाॅइंट करंजाळे टोलनाका, पळस्पे फाटा या मार्गाचा वापर करावा. तसेच कळंबोली वाकण मार्गावरुन जाणाऱ्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे खोपोली-पाली-वाकण या मार्गाचा वापर करावा.

मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबोली-चिपळूण मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे सातारा, उंब्रज-पाटण, कोयनानगर- कुंभार्ली घाट-खेर्डी-चिपळूण या मार्गाचा वापर करावा.

तळकोकण, रत्नागिरीला जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्ग म्हणून मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, सातारा- कोल्हापूर मार्गाचा वापर करावा. असे आवाहन महामार्ग वाहतूक पोलिसांनी केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –