Toll Hike At Khed-Shivapur Pune | खेड-शिवापूर टोलनाक्यावरील दरात 8 टक्क्यांनी वाढ, जाणून घ्या कोणत्या वाहनांना किती भरावा लागेल टोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Toll Hike At Khed-Shivapur Pune | पुणे – सातारा रोडवरील खेड – शिवापूर टोल नाक्यावरील (Khed Shivapur Toll Plaza) टोलच्या दरात वाढ (Toll Rates Hike) करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. खेड – शिवापूर टोल नाक्यावर (Toll Hike At Khed – Shivapur Pune) टोलच्या दरात 8 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. प्रत्येकवर्षी एप्रिल महिन्यात टोलचे दर बदलले (Toll Rates changes) जातात त्यानुसार ही टोल वाढ करण्यात आली आहे.

 

किती द्यावा लागेल टोल ?
जीप (Jeeps) आणि हलक्या वाहनांसाठीच्या (Light Vehicles) टोल दरात 10 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या दरानुसार या वाहनांना आता 110 रुपये टोल द्यावा लागेल. हलक्या व्यावसायिक वाहनांच्या (Commercial Vehicles) टोलच्या दरात 15 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे या वाहनांकडून 175 रुपये टोल आकारला जाणार आहे. तर बस (Bus) आणि ट्रकसाठी (Truck) पूर्वी 325 रुपये टोल होता. यामध्ये 45 रुपयांची वाढ झाली असून आता बस आणि ट्रकसाठी 370 रुपये टोल द्यावा लागेल.

 

पूर्वी जड वाहनांना (Heavy Vehicles) 525 रुपये टोल होता. यामध्ये 60 रुपयांची वाढ झाली असून जड वाहनांना आता 585 रुपये टोल द्यावा लागणार आहे. अवजड वाहनांच्या टोलमध्ये 70 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या टोल दरानुसार या वाहनांना 710 रुपये टोल द्यावा लागेल. (Toll Hike At Khed – Shivapur Pune)

 

दरवर्षी टोलचे दर बदलत असतात. त्यानुसार यावर्षीही एप्रिल पासून टोलचे दर बदलले आहेत. टोल दरात 8 टक्के वाढ झाली आहे.

 

Web Title :- Toll Hike At Khed-Shivapur Pune | Pune khed shivapur toll plaza hike 8 percentage

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा