टोलनाक्यावर १९३ ट्रकची नोंदच नाही

नांदेड : पाेलीसनामा ऑनलाईन

माधव मेकेवाड

शासकीय धान्याचे वजन तंतोतंत मेगा अनाज फॅक्ट्रीच्या वजन काट्यावर आढळले. पोलिसांनी १८ जुलै रोजी १० ट्रकवर केलेल्या कारवाईचे चित्रीकरण असून ट्रक चालकांना जबरदस्तीने मेगा कंपनीत नेल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला.  नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील सहा महिन्याच्या काळात शेकडो ट्रक मेगा कंपनीत उतरल्याचे पुरावे असल्याचे सांगत याबाबत चौकशी अहवाल असलेला पेनड्राईव्ह त्यांनी न्यायालयाला दाखवला. अ‍ॅड. जयप्रकाश तापडिया याच्या हातावरच संपूर्ण आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावेही पोलिसांकडे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान गुरुवारी जामिनासंदर्भातील युक्तीवाद पूर्ण झाला असून २८ सप्टेंबर रोजी यावर निर्णय आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’53d9da4f-c494-11e8-95ac-993e1217bb2e’]

दरम्यान, इंडिया मेगा अनाज कंपनीत हिंगोली जिल्ह्यातीलही ६० ट्रक शासकीय धान्य उतरविल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे हिंगोलीचे वाहतूक ठेकेदार ललित खुराणा हे देखील अडचणीत सापडले आहेत. बिलोली न्यायालयात तीन वेळा सादर केलेल्या ५० पानी अहवालात घोटाळ्याची सविस्तर माहिती देण्यात आली असून यात नांदेडचे दोन आणि हिंगोलीच्या एक अशा तीन वाहतूक ठेकेदारांवर मुख्य आरोप आहेत. नांदेड जिल्ह्यातील १९३ व हिंगोली जिल्ह्यातील ६० ट्रकचे क्रमांक अस्तित्वातच नाहीत. ट्रक क्रमांकाचा सविस्तर तपशीलही न्यायालयात सादर करण्यात आला.

वरील सर्व ट्रक टीपी जुळवणीनुसार एफसीआयमधून निघालेले असून कहाळा टोल मेगा वजन काट्यावरच्या नोंदीत आढळले. दोन-तीन तासाच्या फरकाने पुन्हा कहाळा टोल नाक्यावरून परतीचा प्रवास झाल्याचे रेकॉर्ड सापडले. असाच टीपी जुळवणी नुसार हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, हिंगोली, सेनगाव येथे पोहचवणारे ६० ट्रक शासकीय धान्य मेगा कंपनीतच गेले. बिलोली-देगलूर-मुखेड पाठोपाठ कहाळा-नायगाव मार्ग नसताना टीपी जुळवणी नुसार उमरी, भोकर, हदगाव, किनवट, अर्धापूर, लोहा व हिमायतनगर येथील ५६ धान्याचे ट्रक मेगा कंपनीतच आले. तीन वेगवेगळ्या वाहतुकीचा आकडा आता ३०९ ट्रकवर पोहचल्याचे अहवालावरून दिसून आले.
[amazon_link asins=’B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5bd4d9a4-c494-11e8-990f-5beacbfecd46′]

टोलनाक्यावर १९३ ट्रकची नोंदच नाही
कृष्णूर येथील शासकीय धान्य घोटाळा बिलोली व देगलूर या दोन तालुका पुरवठा विभागात झाला. दोन्ही मार्गावर प्रत्येकी दोन टोलनाके आहेत. एका टोलनाक्यावर १९३ ट्रकची नोंदच नाही. परिणामी शासकीय धान्य इंडिया मेगा अनाज कंपनीत गेल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला. वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार यांच्या पहिल्या टप्प्यातील वाहतुकीसाठी शासनाकडे नोंद असलेल्या ५८ पैकी १८ ट्रकवर जीपीएस यंत्रणाच नव्हती. जीपीएस नसलेल्या ट्रकमधूनच हजारो क्विंटल शासकीय धान्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली.

जाहिरात