टोलधाड ! पुणे-मुंबई ‘एक्सप्रेस-वे’वरील Toll मध्ये मोठी ‘वाढ’, ‘हे’ आहेत नवीन दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोलमुक्तीची अपेक्षा प्रवाशांकडून केली जात होती. मात्र, प्रवाशांच्या या आपेक्षेवर पाणी पडणार आहे. द्रुतगती महामार्गावरील टोल वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या 1 एप्रिलपासून पुणे-मुंबई असा नियमित प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या दरम्यान प्रवास करणाऱ्या कारसाठी 40 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या कारला 230 रुपयांचा टोलच्या किंमतीत मोठी वाढ होऊन कार चालकांना 270 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे.

येत्या 1 एप्रिल पासून टोलचे नवे दर लागू होणार आहेत. कारबरोबरच मिनीबस व अवजड वाहनांकडून आकारल्या जाणाऱ्या टोलच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.

खालील प्रमाणे आहेत नवी दर…

सध्या बससाठी 675 रुपये आकारले जात होते. नव्या दरानुसार 797 रुपेय आकारले जाणार आहेत. तसेच मिनीबस, ट्रक, बसेस, क्रेन या वाहनांचेही टोल आता वाढणार आहेत. मिनीबसचा टोल 355 वरून 420, ट्रक 2 अॅक्सलचा टोल 493 वरून 580 रुपये, दोनपेक्षा जास्त अॅक्सल असलेल्या ट्रकचा टोल 1168 वरून 1380 रुपये तर क्रेनचा 1555 वरून 1835 इतका करण्यात आला आहे.

नव्याने 15 वर्षासाठी करार
द्रुतगती महामार्गावरील टोलवसुलीचं कंत्राट आरबीआय इन्फ्रास्ट्रकचर या कंपनीला देण्यात आले आहे. त्यानंतर या टोलमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 2004 ऑगस्ट साली म्हैसकर इन्फ्रास्ट्रकचर प्रा. कंपनीला 15 वर्षांसाठीचे कंत्राट देण्यात आले होते. याची मुदत ऑगस्ट 2019 मध्ये संपुष्टात आली. आता आरबीआयला एमएसआरडीसीनं 8261 कोटी रुपयांकरता पुढील 15 वर्षासाठी टोल वसुलीचे कंत्राट दिलं आहे.