‘टोल’ वसुलीचे कंत्राट पुन्हा IRB कंपनीलाच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-पुणे या द्रुतगती महामार्गावरील टोली वसुलीसाठी निविदा दाखल करण्याची मुदत १० फेब्रुवारी, २०२० रोजी संपली. मंगळवारी तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या. फेरनिविदा प्रक्रियेत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरचीच निविदा आल्याचे तांत्रिक निविदा छाननीत समोर आले. त्यामुळे मुंबई-पुण्याच्या टोल वसुलीचे कंत्राट ‘आयआरबी’ला मिळण्याची चिन्हे आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गाचा टोल आयआरबी वसूल करत असे ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांची मुदत संपली होती. त्यानंतर निविदा काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली मात्र मुदत वाढवून देऊनही इतर कोणाचाही निविदा न आल्याने निविदा आलेल्या आयआरबी या एकमेव कंपनीला काम देण्यात आले.

मूल्यमापन सुरु,अंतिम निर्णयाची प्रतीक्षा
निविदा प्रक्रियेमध्ये केवळ आयआरबी या कंपनीचाच निविदा सादर झाल्याने याबाबतचे मूल्यमापन सध्या सुरु आहे. त्यामुळे आम्ही देखील अंतिम निर्णयाची वाट पाहत असल्याचे आयआरबीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.