Tollywood News | पुन्हा एकदा ‘हि’ जोडी येणार एकत्र; चाहत्यांना दिली गुड न्यूज

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Tollywood News | सध्या अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. एवढेच नाही तर समंथाचा नवीन चित्रपट ‘यशोदा’ (Yashoda) च्या प्रमोशन साठी समंथा बिझी असल्याचेही दिसत आहे. समंथा आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) या दोघांच्या जोडीला चाहत्यांची आवडती जोडी असे म्हंटले जाते. मात्र सध्या समंथा आणि नागा वेगळे झाल्यापासून चाहत्यांना कित्येकदा असे वाटते की पुन्हा ह्या दोघांनी एकत्रित येऊन काम करावे. आता दोघांनी एकत्रित प्रोजेक्ट साइन केला असून दोघे एकत्र काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Tollywood News)

 

मिळालेल्या माहितीनुसार समंथा आणि नागा चैतन्य यांनी एकत्र एक प्रोजेक्ट सायन केले होते. ज्यामध्ये हे दोघे पुन्हा एकदा एकत्र काम करणार होते. या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती अद्याप जरी समोर आली नसली तरी चाहत्यांमध्ये या दोघांना एकत्रित पाहण्यासाठी उत्साह मात्र वाढला आहे. चाहत्यांना ही जोडी प्रचंड आवडते. त्यामुळे यांनी आपली पर्सनल भांडणं बाजूला ठेवून पुन्हा एकदा एकत्रित येऊन काम करावे अशी चाहत्यांची इच्छा होती. नागा आजही समंथाला त्याची चांगली मैत्रीण समजतो. जेव्हा समंथाने आपल्या आजाराविषयी सोशल मीडियावर पोस्ट केले तेव्हा नागा आणि त्याचे वडील अभिनेते नागार्जुन (Nagarjuna) यांनी काळजी करत समंथाची विचारपूस केली होती.

 

एका सिनेमाच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. ही ओळख हळूहळू पुढे जात 2017 मध्ये त्यांनी लग्न केले होते.
ही जोडी चाहत्यांच्या मनात घर करून राहिली होती. या जोडीला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं होतं.
समंथाची प्रसिद्धी वाढत चालली तेव्हा नागानी तिला “तू आता अभिनय थांबव” असे म्हटल्यावर या दोघांमध्ये वाद निर्माण झाले.
शेवटी 2021 मध्ये दोघांनी सामंजस्यानं घटस्फोटाचा (Divorce) निर्णय घेतला. यानंतर त्यांनी या नात्याला पूर्णविराम दिल्याचे सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत जाहीर केले.

 

Web Title :- Tollywood News | samantha ruth prabhu naga chaitanya together in new film after divorce

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Udayanraje Bhosale | “इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर…”; उदयनराजे भोसलेंचा सरकारला सल्ला

Shivsena | “भाजपचे अनेक नेते तुरुंगात जातील असे गुन्हे असताना देखील…”; सामन्यातून शिवसेनेचा हल्ला

Pune Crime | 79 वर्षाच्या ‘शौकीन’ वृध्दास ‘डेटींग’ची हौस पडली 17 लाखांना, जाणून घ्या वारजे माळवाडीमधील प्रकरण